मुंबई : भाजपकडून काल रात्री तिन्ही जागांसाठी उमेदवारांच्या नावांची घोषणा करण्यात आली. यात केंद्रीय मंत्री पियूष गोयल आणि राज्याचे माजी कृषीमंत्री अनिल बोंडे आणि कोल्हापूरचे धनंजय महाडिक यांचा नावांचा समावेश आहे. मात्र राज्यसभेसाठी माजी मंत्री पंकजा मुंडे यांचं नाव नसल्याने त्या नाराज असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरु आहे.
“चंपादादा सारख्या राक्षसी विचारांचे मुंडक छाटणारच”; रूपाली पाटील
याबाबत पंकजा मुंडे यांनी आपली प्रतिक्रिया देताना म्हणाल्या, विधान परिषेदबाबत मला अजिबात इच्छा नाही आता पक्ष योग्य तो निर्णय घेईल, अशी प्रतिक्रिया पंकजा मुंडे यांनी दिली. तसेच, राज्यसभेसाठी माझ नाव चर्चेत नाही पण ज्यांना उमेदवारी मिळाली तर त्याचा आनंद आहे. पियुषजींना उमेदवारी मिळण अपेक्षित होतं आणि त्यांना ती मिळाली. विदर्भात अनिल बोंडेंना संधी मिळाली, शेतकऱ्यांच्या प्रश्नावर बोलण्याची संधी मिळाली त्यांनाही माझ्या शुभेच्छा. अशा भावनाही त्यांनी व्यक्त केल्या. देंवेद्र फडणवीस म्हणाले होते पंकजा मुंडे सर्व जागांसाठी पात्र आहेत असे विचारले असता, मी जिथे आहे तिथही माझं चांगलच सुरु आहे, असंही पंकजा मुंडेंनी सांगितलं.
“तर पक्षाच्या नावात ‘शिव’ वापरायचा नैतिक अधिकार नाही”; शिवसेनेवर भाजपची जहरी टिका
दरम्यान, या मुद्द्यावरुन आता राज्याचे सामाजिक न्यायमंत्री धनंंजय मुंडे यांनी पंकजावर निशाणा साधला. पात्र असण आणि जबाबदारी देणं यातलं जे अंतर आहे ते अडचणीचं ठरु नये, अशा शब्दांत धनंजय मुंडेंनी पंकजांना चिमटा काढला.
Read also:
- ‘भाजपने संभाजीराजे यांना फसवलं,स्वार्थासाठी संभाजीराजेंची ढाल केली’, राऊतांचा निशाणा
- धनंजय महाडिकांचा उमेदवारी अर्ज दाखल; भाजपच्या तिन्ही जागा जिंकून येतील; महाडिकांचा दावा
- “मुख्यमंत्र्यांच्या बदनामीचा कट रचणाऱ्यांना जशास तसे उत्तर दिले जाईल”
- आयुष्याची ४५ वर्षे सामाजिक, राजकीय जीवनात..; चंद्रकांत पाटलांचा सुप्रिया सुळेंबाबत जाहीरनामा
- “घसा ओरडुन पत्रकार परिषदा घेणाऱ्या किरीट काकांना राज्यसभेवर न घेतल्याने सामान्य जनता नाराज”