पुणे : मराठा समाजातील ज्या व्यक्तींच कुणबी अशी निजामकालीन नोंद असेल त्यांना इतर मागास प्रवर्गातील दाखले दिले जातील. अशी घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी काल केली. तर मराठा समाजातील सर्वच व्यक्तींना सरसकट कुणबी प्रमाणपत्र दिलं तर उपोषण मागे घेणार अशी भूमिका मनोर जरांगे पाटलांनी घेतली आहे. यावर आता भाजपच्या नेत्या पंकजा मुंडे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना टोला हाणला आहे.
हेही वाचा…“..तर मी उपोषण मागे घेतो, निर्णय मान्य,पण…,” जरांगे पाटलांनी सरकारकडे घातली ‘ही’ अट
मी वेळोवेळी हा विषय मांडला आहे. मराठा समाजाला आरक्षण दिलं गेलं पाहिजे. त्यासाठी अभ्यासगट स्थापन करून योग्य त्या प्रमाणात त्यांना आरक्षण दिलं गेलं पाहिजे. त्यानंतर इतर गोष्टी येतात. कुणीही घोषणा करून, वक्तव्य करून मराठा आरक्षण मिळणार नाही. मराठा आरक्षण न्यायिक, संविधानिक प्रक्रियेवर टिकणारं असलं पाहिजे. असं पंकजा मुंडे यांनी म्हटलंय.
हेही वाचा…मोठी बातमी…! देशात नरेंद्र मोदी सरकार पुन्हा नोटबंदी करणार ?
दरम्यान, मुख्यमंत्री एकनात शिंदे यांनी काल मराठा समाजसंदर्भात निर्णय घेतले. माझ्याकडे काल अर्जून खोतकर, राजेश टोपे आणि नंतर रावसाहेब दानवे आले होते. ज्या मराठा समाजाकडे कुणबीची नोंद आहे. त्यांना आजपासून त्यांना कुणबी प्रमाणपत्र भेटणार आहे. पण आमचं म्हणणं आहे, एकच सुधारणा करा. आमच्याकडे वंशावळीचे प्रमाण पत्र नाहीत. त्यामुळे वंशावळी शब्द काढा अन् सरसकट प्रमाण पत्र मिळेल, असं म्हणा, मी उपोषण मागे घेतो असं जरांगे पाटील म्हणाले.
READ ALSO :
हेही वाचा…“मराठी सणावर बंदी आणण्याचा डाव रचला गेला होता तेव्हा..,” राज ठाकरेंचा ‘तो’ व्हिडीओ ट्विट करत मनसेने फडणवीसांना डिवचलं
हेही वाचा…शरद पवारांच्या सभांचा धडका, अजित पवार गटातही जोरदार हालचाली सुरू
हेही वाचा…शरद पवार गटाची मुंबईत तातडीची बैठक, सर्वच आजी, माजी आमदार, खासदारांना बोलवलं, चर्चांना उधाण
हेही वाचा…“जुन्या बाटलीवर नवीन लेबल लावून मराठ्यांना फसवण्याचा प्रयत्न महायुती सरकार करतंय का ?”
हेही वाचा…“नाव बदलून प्रश्न सुटत असतील तर..,” रोहित पवारांचा नरेंद्र मोदींवर घणाघात