नवी दिल्ली : एकेकाळी भाजपवर आरोपांची गरळ ओकणारा गुजरातमधील पाटीदार समाजाचा नेता हार्दिक पटेल भाजपमध्ये प्रवेश करणार आहे. येत्या 2 जून रोजी हार्दिक पटेल भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याची बातमी समोर येत आहे. त्यांनी अलिकडेच काॅंग्रेस नेतृत्वावर प्रश्नचिन्ह उपस्थित करत काॅंग्रेसला सोडचिठ्ठी दिली होती. त्यामुळे आगामी निवडणुकीत भाजप त्याला विधानसभेची उमेदवारी देखील देण्याची शक्यता आहे.
अन् केंद्रीय मंत्र्यांनीच स्वत: च्या मुलाचा केला सत्कार; भावुक होऊन व्यासपीठावरच ढसाढसा रडले
गुजरातमध्ये येत्या डिसेंबर महिन्यात विधानसभेसाठी निवडणुका होणार आहेत. यावेळी भाजपला गुजरातमध्ये सत्ता राखण्यात मोठी मेहनत घ्यावी लागणार आहे. कारण त्यांना काॅंग्रेस आणि आप जोरदार टक्कर देण्याची शक्यता आहे. नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली मागील काही वर्ष गुजरात हे भाजपच्या ताब्यात आहे. त्यामुळे सध्या गुजरातमध्ये राजकीय घडामोडी जोरदार घडताना दिसत आहेत.
आघाडी अन् इतर अपक्ष सदस्यांची मतांचा हिशोब केला तर..; प्रफुल पटेलांनी सांगितलं विजयाचं सुत्र
हार्दिक पटेलने अलिकडेच काॅंग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांना एक पत्र पाठवून काॅंग्रेस पक्षातून राजीनामा देत असल्याचं म्हटलं होतं. त्या पत्रात हार्दिक पटेलने काॅंग्रेस नेतृत्वाबाबत अनेक प्रश्न उपस्थित केले होते. तसेच गुजरातमधील ज्येष्ठ नेत्यांवर देखील त्यांनी गंभीर आरोप केले. काॅंग्रेसमधून राजीनामा दिल्यानंतर ते कोणत्या पक्षात जाणार त्याकडे सगळ्यांचं लक्ष होतं. अखेर त्यांनी हातात कमळ बांधणार असल्याचं निश्चित केलं आहे.
भाजपने वाढविली शिवसेनेची डोकेदुखी; महाडिकांना विजयासाठी लागणाऱ्या १० मतांची झाली तडजोड
दरम्यान, मागील लोकसभेच्या निवडणुकीत तरूणांचा फौज भाजपविरोधात उभी होती. त्यामध्ये हार्दिक पटेल, जिग्नेश मेवाणी आणि हार्दिक पटेल यांनी भाजपवर जोरदार टिकास्त्र सोडलं होतं. त्यांच्याकडे देशातील राजकारण त्यावेळी फिरत होतं. तसेच तरूण नेतृत्व उदयास येत आहे. अशा पद्धतीच्या चर्चा देखील रंगल्या होत्या. मात्र हार्दिक पटेल यांनी भाजपमध्ये प्रवेश केल्यास तरूणांचा एक गट त्यांच्यावर नाराज होण्याची शक्यता आहे.
Read also:
- “दिपाली सय्यद यांच्यावर त्वरीत कारवाई करून त्यांचा पायउतार करावा”; भाजपचं महिला आयोगाला पत्र
- “25 वर्ष सेनेचा मुख्यमंत्री, तर राष्ट्रवादीसाठी सुप्रिया सुळे यांचं नवस, मग काॅंग्रेस काय फक्त सतरंज्या उचलणार?”
- पेडणेकरांचा लुडो खेळताना फोटो व्हायरल; निलेश राणे म्हणाले, ”मुंबईकरांनो तुमचे प्रश्न आता..;”
- “शेतकऱ्यांना दोन पैसे जास्त मिळू लागले की केंद्र सरकारला ते पहावत नाही”; शरद पवार
- आघाडीत बिघाडी होण्याची शक्यता; काॅंग्रेस शिर्डीतील अधिवेशनात राजकीय बॉम्ब फोडणार