नवी दिल्ली : आगामी काही काळात गुजरातमध्ये विधानसभेच्या निवडणुका होऊ घातल्या आहेत. त्यासाठी राजकीय पक्ष जोरदार तयारी करताना दिसत आहेत. गुजरातमध्ये दिल्लीचे मुख्यमंत्री अरविदं केजरीवाल यांनी गुजरातमध्ये सर्व जागा लढविणार असल्याचं स्पष्ट केल्यानंतर आता गुजरातमध्ये जोरदार रंगत होणार आहे. त्याच अनुषंगाने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गुजरातचा दौरा केला. यावेळी त्यांनी मोठ्या मोठ्या कामांचा उद्घाटन केला.
“सत्य, परखड बोलणारे भाजपचे एकमेव नेतृत्व म्हणजे नितीन गडकरी”; रूपाली पाटील
सुरतमध्ये नरेंद्र मोदी यांच्या हस्ते तब्बल 3400 कोटींच्या विविध विकास प्रकल्पांचं उद्घाटन करण्यात आलं. तसेच गुजरातमध्ये 36 वी राष्ट्रीय क्रीडा स्पर्धा पार पडणार असून नरेंद्र मोदी यांच्या हस्ते त्यांचं उद्घाटन करण्यात आले. मात्र एका कार्यक्रमादरम्यान नरेंद्र मोदी यांचं भाषण सुरू असताना लोकांनी काढता पाय घेतला. याचा व्हिडीओ काॅंग्रेसने ट्विट केला असून जनता आता भाजपला वैतागली असल्याचं त्यांनी म्हटलं आहे.
“प्रभू रामाच्या शिकवणीवर राहुल गांधी यांची पदयात्रा सुरूय”
नरेंद्र मोदी यांचं भाषण सुरू असताना लोकांनी कार्यक्रमातून बाहेर पडल्याने काॅंग्रेसने त्यांच्यावर जहरी टिका केली आहे. स्वत: च्या राज्यातच जर ही गत असेल तर इतर ठिकाणची परिस्थिती काय असेल हे न बोललेलेच बरं. तुमच्या जुमलेबाजीला जनता वैतागली आहे मोदीजी. असा खोचक टोला देखील त्यांनी लगावला. तसेच मोदींच्या खोटारडेपणाला त्रासलेली जनता रॅलीतील भाषण न ऐकताच निघून गेली. आता देशातील जनता फसणार नाही. कोणत्याही जुमल्यांवर विश्वास ठेवणार नाही. असा टोला देखील त्यांनी लगावला आहे.
स्वतःच्या राज्यातच जर ही गत असेल तर इतर ठिकाणची परिस्थिती काय असेल हे न बोललेलेच बरं.
तुमच्या जुमलेबाजीला जनता वैतागली आहे मोदीजी! pic.twitter.com/6EHyKFaAiZ
— Maharashtra Congress (@INCMaharashtra) October 1, 2022
Read also
- “सुर्य आणखी तेजस्वी होईल अन् महाराष्ट्राला लागलेलं ग्रहण लवकरच सुटेल”
- भाजपशी युती नको म्हणणाऱ्या अब्दुल सत्तारांना पाटलांचा सुचक इशारा..! म्हणाले,..;
- “आता देवी सरस्वतीही वाचवू शकणार नाही, महाराष्ट्रात आता हिंदुत्वाचे सरकार”;
- छगन भुजबळांवर गुन्हा दाखल..! जीवे ठार मारण्याची दिली धमकी
- “मोदींनीही आत्मनिर्भर व्हावं, किती दिवस दुसऱ्या पक्षातील माणसं पक्ष चालवणार”