मुंबई : राज्याच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात सध्या सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये प्रचंड आरोप-प्रत्यारोप टिका टिपण्णी होतांना दिसत आहे. भाजप नेते आणि आमदार नितेश राणे यांनी सभागृहात खासदार संजय राऊत यांच्यावर अप्रत्यक्षपणे जहरी टिका केली. त्यावर अपक्ष आमदार आणि माजी राज्यमंत्री बच्चू कडू यांनी त्यावर भाष्य करत त्यांना गुवाहाटीला पाठवून द्या. असा पलटवार केल्याने सभागृहात एकच गोंधळ उडाला.
हेही वाचा..“माणसं नसतांना, फेसबुक लाईव्ह असतांना, चहापाणी कसा झाला?” अजित पवारांना उत्तर शिंदेंचा ठाकरेंना खोचक टोला
सभागृहात भटके जनावरे, भटके कुत्रे यांचा मुद्दा चर्चेला आला होता. त्यावर बोलतांना, २०१९ पासून राज्यात एका भटक्या कुत्र्याचा महाराष्ट्रात प्रचंड त्रास होत आहे. त्याचा कुठेतरी बंदोबस्त करा. किंवा त्याची नसबंदी करा. अशी मागणी नितेश राणे यांनी सभागृहात केली. यावरून त्यांनी शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांच्यावर अप्रत्यक्ष निशाणा साधला. त्यावर बच्चू कडू यांनीही शाब्दिक टोलेबाजी करत त्याला गुवाहाटीला पाठवून देण्याची मागणी केली.
हेही वाचा..पोलीस भरतीचा तो मुद्दा अजित पवारांनी सभागृहात मांडला, राज्य सरकारकडे केली ‘ही’ मागणी
जेवढे रस्त्यावर आहेत, तेवढे उचला अन् आसाम मध्ये नेऊन टाका, आसाम मध्ये या कुत्र्यांना ८ ते ९ हजार रूपयांची किमंत आहे. आम्ही गुवाहाटीला जाऊन आल्यानंतर तिथे विचारलं. जसे आपल्याकडे बोकड खातात, तसे तिकडे कुत्रे खातात. त्यावर तिथल्या व्यापाराशी बोलून व्यवहार केला तर यावर तोडगा निघू शकतो. असं म्हणत बच्चू कडू यांनी देखील यावर भाष्य केलं.
Read also
- हेही वाचा..सत्यजीत तांबेंचं सभागृहात पहिलचं भाषण, थेट फडणवीसांनी घेतलेल्या निर्णयांवर ठेवलं बोट
- हेही वाचा.“संजय राऊत अन् आदित्य ठाकरेंची सुरक्षा काढून घ्या,” माजी खासदाराची फडणवीसांकडे मागणी
- हेही वाचा..““रोज उठा आदित्यांना शिव्या द्या, अन् प्रसिद्धी मिळवा, मनसेचा हा नवा धंदा,” आदित्य ठाकरेंची बोचरी टिका
- हेही वाचा..“रोग हाल्याला, इंजेक्शन पखालीला,” एसटी कर्मचाऱ्याला निलंबित केल्यानंतर अजित पवारांचा संताप
- हेही वाचा..‘शिट्टी ‘ने घड्याळाचे काटे बंद केले, पण राहुल कलाटे डिपॉझिट वाचू शकले नाहीत, वाचा सविस्तर