मुंबई – कोरोना लसीकरणाच्या नोंदणीसाठी वापरत असलेल्या CoWIN अॅपमध्ये अनेक तांत्रिक त्रुटी आहेत. त्यामुळे महाराष्ट्र सरकारला लसीकरणासाठी स्वत:चं अॅप वापरु द्यावे, अशी मागणी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Cheif Minister Uddhav Thackeray) यांनी केली होती. यासंदर्भात त्यांनी केंद्र सरकारला पत्र पाठवले होते. हे पत्र पाठवल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना फोन केला होता. आणि महाराष्ट्रातील कोरोना परिस्थितीचा आढावा घेतला.( PM Modi calls Uddhav Thackeray, praises Maharashtra’s Corona battle)
कोरोनाविरुद्ध लढाईत महाराष्ट्र होत असलेल्या प्रयत्नांबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडून दूरध्वनीद्वारे माहिती घेतली तसेच दुसऱ्या लाटेशी मुकाबला करतांना महाराष्ट्र चांगली लढाई लढतो आहे असे सांगितले.
यावेळी मुख्यमंत्र्यांनी देखील विशेषत: महाराष्ट्राला ऑक्सिजनच्या बाबतीत अधिक बळ मिळावे अशी विनंती केली व विविध उपाययोजनांची माहिती दिली. तिसऱ्या लाटेला तोंड देण्यासाठी कसे नियोजन करीत आहोत त्याविषयीही मुख्यमंत्री बोलले.
पंतप्रधान आणि केंद्र सरकार हे कोरोना लढ्यात महाराष्ट्राला प्रथमपासून मार्गदर्शन करीत असून त्याचा चांगला उपयोग राज्य सरकारला होतो आहे, महाराष्ट्राच्या काही सुचना केंद्राने मान्यही केल्या याविषयीही मुख्यमंत्र्यांनी पंतप्रधानांचे आभार मानले
Read Also
- ऑक्सिजन न मिळाल्याने झाला, मराठमोळ्या ऑक्सिजन संशोधकाचा मृत्यू
- फडणवीसांनी साधला वजनदार मंत्र्यांवर निशाणा म्हणाले…
- पुण्यात उभारलं जाणार देशातलं पहिलं ‘चाईल्ड कोविड सेंटर; महापालिकेचा निर्णय
- “…तर ते माझ्या जीवाचं बरं-वाईट करायलाही मागे पुढे पाहणार नाहीत”, अँटिलीया जिलेटीन स्फोटकं प्रकरणाला नवे वळण
- ‘एसटीच्या कर्मचाऱ्यांना प्राधान्याने लस उपलब्ध करून द्यावी’