मुंबई : केंद्र सरकारने प्रतिक्विंंटल २४१० रूपये कांदा खरेदी करण्याचा निर्णय घेतला आहे. मागील काही दिवसापासून कांदा निर्यात शुल्क वाढीसंदर्भात शेतकऱ्यांनी आक्रमक भुमिका घेतली होती. त्यावर आता केंद्रीय मंत्री पियुष गोयल यांनी यासंदर्भात २४१० प्रतिक्विंटल कांदा खरेदी करण्याचा निर्णय घेतला. त्यावर केंद्र सरकारने ४००० भाव द्यावा, अशी मागणी केली होती. त्यावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी टिका केली. त्यावर शरद पवारांनी त्यावर प्रत्युत्तर दिलंय.
हेही वाचा…फडणवीस साहेब…! “राजकीय खेळात सर्वसामान्य शेतकऱ्यांचा बळी देऊ नका,” रोहित पवारांनी सरकारचं पितळ उघडं पाडलं
केंद्र सरकराचा निर्णय शेतकऱ्यांची अपेक्षा पुर्ण करणार नाही. केंद्र सरकारने प्रति क्विंटल दिलेला २४१० हा भाव खुपच कमी आहे. शेतकऱ्यांच्या कांद्याला प्रति क्विंंटल चार हजार भाव द्यावा अशी मागणी शरद पवारांनी केंद्र सरकारकडे केली आहे. तर शेतकऱ्यांचा उत्पादन खर्च २४१० मध्ये भरून निघणार नाही. कांदा हा टिकणारा आहे. त्यामुळ शेतकरी थांबायला तयार आहे. त्यामुळे निर्यात शुल्क कमी करावे असंही शरद पवारांनी म्हटलं आहे.
हेही वाचा…“लोकं तुमच्या तोंडात आता शेण घालणार”, अंबादास दानवे कांदा प्रश्नावरून दादा भुसे यांच्यावर भडकले
केंद्र सरकारने आज कांद्याबाबत मोठी घोषणा केली. त्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पत्रकार परिषद घेतली. या पत्रकार परिषदेत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शरद पवारांवर टिका केली. केंद्रात शरद पवार दहा वर्ष कृषी मंत्री होते. त्यावेळी कांद्याला इतका भाव नव्हता. त्यामुळे कांद्यावरून राजकारण न करता केंद्र सरकारच्या निर्णयाचं स्वागत करा. असं शिंदेंनी म्हटलं. त्यावर मी कृषी मंत्री असतांना कधी निर्यात शुल्क ४० टक्के लावली नव्हती. आज लावलेली निर्यात शुल्क विथड्राफ्ट करावी असं पवारांनी म्हटलं.
READ ALSO :
हेही वाचा…“केंद्र सरकारचा शेतकऱ्यांसोबत मोठा डाव, कांद्यावरून सरकारने शेतकऱ्यांना फसवलं ?” वाचा सविस्तर
हेही वाचा…“कांदा प्रश्नावरून अटल बिहारी वाजपेयींचं सरकार पडलं, म्हणून एवढे घाबरता का ?”
हेही वाचा…“२४१० नाही तर ४००० प्रतिक्विंटल कांद्याला भाव द्या,” शरद पवारांची केंद्र सरकारकडे मागणी
हेही वाचा…“मासे खाल्ल्याने एश्वर्या रॉयचे डोळे सुंदर, शिंदेंच्या मंत्र्यांना महिला आयोगाची नोटीस, कारवाई होणार”
हेही वाचा…“ज्यांच्या तोंडात घाणेरड्या शिव्या, त्यांना ब्राम्हण कोण म्हणणार?”, छगन भुजबळांचं प्रत्युत्तर