पुणे : दररोज मासे खाल्ल्यानेच ऐर्श्वया रॉयचे डोळे आणि त्वचा सुंदर आहेत. तुम्हीही दररोज मासे खाल्ले की तुमचेही डोळे सुंदर होतील. असं विधान आदिवासी विकास मंत्री विजय कुमार गावित यांनी केलं होतं. त्यानंतर राज्यातील विरोधी पक्षातील नेत्यांसह सत्ताधारी पक्षांतील नेत्यांनी यावर टिका केली. यातच आता विजय कुमार गावित यांना महिला आयोगाची नोटीस पाठवण्यात आली आहे.
हेही वाचा…“कांद्याने शेतकऱ्यांना रडवलं, अन् शेतकऱ्यांनी सरकारला,” केंद्र सरकारचा मोठा निर्णय
धुळे जिल्ह्यात सभेत बोलत असतांना मंत्री विजय कुमार गावित यांनी महिलांचा अवमान होईल असे वक्तव्य केले. लोकप्रतिनिधींच्या वक्तव्याचा, वर्तनाचा दीर्घ परिणाम समाजमनावर होत असतो. त्यामुळे लोकप्रतिनिधींनी समाजात वावरताना त्यांच्यावर असलेल्या जबाबदारीचे भान ठेवणे आवश्यक आहे. याच अनुषंगाने गावित यांनी केलेल्या वक्तव्याबाबतत राज्य महिला आयोगास तीन दिवसात खुलासा सादर करावा, असं राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रूपाली चाकणकर यांनी केलं आहे.
हेही वाचा…शरद पवारांची मोठी राजकीय खेळी, ३६ जिल्हांसाठी नेमले जिल्हा प्रभारी
प्रत्येक वेळेस रस्त्यांची उदाहरण देतांना किंवा इतर उदाहरण देतांना महिला कशासाठी लागतात ? समाजातील लोकांची मानसिकता ही महिलांना सन्मान देणारी असली पाहिजे. सातत्याने महिलांना दुय्यम लेखणं, त्यांच्याबद्दल अशी वक्तव्य करणं हे समाजात मान्य होत नाही. त्यामुळे समाजाची परंपरा मोडीत काढावी लागणार आहे. त्यासाठी पक्षांचा त्यापद्धीतीचा अजेंडा असला पाहिजे. असं रूपाली चाकणकर यांनी म्हटलं आहे.
हेही वाचा…“१५ वर्षापासून आमदार, ८ वर्ष मंत्री पद कोल्हापुरसाठी काय केलं ?” , महाडिकांनी सतेज पाटलांकडून हिशोब मागितला
महिला आयोग हे दिवाणी न्यायालय म्हणून काम करीत असतं. यामध्ये महिला आयोग दोन्ही बाजुना आपलं म्हणणं मांडण्यासाठी संधी देत असतो. यातच ज्यावेळी संंबंधित व्यक्तीला आमच्याकडून नोटीसा दिल्या जातात. त्यावेळी ते दिलगिरी व्यक्त करून असं होणार नाही असं सांगत असतात. त्यानंतर ही सर्व प्रक्रिया कोर्टात जाते. त्यानंतर आम्ही त्यावर कारवाई करत नाही. असंही त्या म्हणाल्या.
दरम्यान, धुळे जिल्ह्यातील अंर्तूला येथे आदिवासी मच्छीमार बांधवांना मासेमारीचे साहित्य वाटप करण्यात आले होते. यावेळी विजय कुमार यांनी हे विधान केले आहे. त्यावेळी व्यासपीठावर डॉ. सुप्रिया गावितही उपस्थित होत्या. दररोज मासे खाल्ल्यामुळेच अभिनेत्री ऐश्वर्या रॉय हिचे डोळे सुंदर आहेत. तुम्हीही दररोज मासे खाल्ले की तुमचेही डोळे सुंदर होतील, अन् जिला पटवायचे तिला पटवूनच घ्याल असे वक्तव्य विजयकुमार गावित यांनी केले आहे.
READ ALSO :
हेही वाचा…“ज्यांच्या तोंडात घाणेरड्या शिव्या, त्यांना ब्राम्हण कोण म्हणणार?”, छगन भुजबळांचं प्रत्युत्तर
हेही वाचा…फडणवीस साहेब…! “राजकीय खेळात सर्वसामान्य शेतकऱ्यांचा बळी देऊ नका,” रोहित पवारांनी सरकारचं पितळ उघडं पाडलं
हेही वाचा…“लोकं तुमच्या तोंडात आता शेण घालणार”, अंबादास दानवे कांदा प्रश्नावरून दादा भुसे यांच्यावर भडकले
हेही वाचा…केंद्रीय मंत्री पियुष गोयल यांची मोठी घोषणा, 2410 रुपये प्रतिक्विंटल दराने कांदा खरेदी करणार
हेही वाचा…“तोपर्यंत केंद्रातल्या मंत्र्यांच्या गळ्यात कांद्याची माळ घाला, ” अमोल कोल्हें केंद्र सरकारच्या विरोधात आक्रमक