नवी दिल्ली : केंद्र सरकारने कांदा निर्यातीवर ४० टक्के निर्यात शुल्क लागू केल्यानंतर राज्यातील कांदा उत्पादक शेतकऱ्यांनी आक्रमक भूमिका घेतली आहे. मागील दोन दिवसापासून नाशिक येथील कांदा बाजारपेठाही बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. तर आज कृषी मंत्री धनंजय मुंडे यांनी केंद्रीय मंत्री पियुष गोयल यांची भेट घेतली तर जपानमधून राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केंद्रीय मंत्री अमित शहा आणि पियुष गोयल यांच्याशी फोनवरून संवाद साधला.
हेही वाचा…“एखाद्याला गुर्मी येते, तशी गुर्मी भाजपला येत गेली”, मित्र पक्षांच्या नेत्याचा भाजपवर जोरदार हल्लाबोल
राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी याबाबत ट्विट करत माहिती दिलीय. महाराष्ट्रातील कांदा उत्पादकांच्या प्रश्नासाठी आज आमचे नेते केंद्रीय मंत्री अमित शहा तसेच केंद्रीय मंत्री पियुष गोयल यांच्याशी जपानमधून दुरध्वनीवर संपर्क केला. केंद्र सरकारने २ लाख मेट्रिक टन कांदा खरेदी करण्याचा निर्णय घेतला असून महाराष्ट्रातील कांदा उत्पादकांचे हित जपण्यासाठी नाशिक आणि अहमदनगर येथे विशेष खरेदी केंद्र सुरू करण्यात येतील, अशी घोषणा त्यांनी केली आहे. २४१० प्रतिक्विंटल या दराने ही खरेदी करण्यात येईल. यातून मोठा दिलासा आपल्या राज्यातील कांदा उत्पादकांना मिळेल. असं फडणवीसांनी म्हटलंय.
हेही वाचा…“चंद्रकांत खैरेंचं वय वाढलं, पण राजकीय अक्कल काही वाढली नाही”
दरम्यान, कांदा निर्यातीवर ४० टक्के लागू केल्यानंतर राज्यातील विरोधी पक्षातील नेत्यांनी आक्रमक पवित्रा हाती घेतला आहे. राष्ट्रवादीचे खासदार अमोल कोल्हे यांच्या नेतृत्वाखाली पुण्यातील आळेफाटा येथे आंदोलन करण्यात येत आहे. तर राज्याच्या विविध भागात केंद्र सरकारच्या विरोधात जोरदार आंदोलन करीत पुतळे जाळण्यात येत आहेत.
महाराष्ट्रातील कांदा उत्पादकांच्या प्रश्नासाठी आज आमचे नेते केंद्रीय गृहमंत्री मा. अमितभाई शाह तसेच केंद्रीय मंत्री मा. पियुष गोयलजी यांच्याशी जपानमधून दूरध्वनीवर संपर्क केला.
केंद्र सरकारने 2 लाख मेट्रिक टन कांदा खरेदी करण्याचा निर्णय घेतला असून महाराष्ट्रातील कांदा उत्पादकांचे…— Devendra Fadnavis (@Dev_Fadnavis) August 22, 2023
READ ALSO :
हेही वाचा…शरद पवारांची मोठी राजकीय खेळी, ३६ जिल्हांसाठी नेमले जिल्हा प्रभारी
हेही वाचा…“१५ वर्षापासून आमदार, ८ वर्ष मंत्री पद कोल्हापुरसाठी काय केलं ?” , महाडिकांनी सतेज पाटलांकडून हिशोब मागितला
हेही वाचा…मोठी बातमी…! गिरणी कामगारांसाठी एकनाथ शिंदे यांची मोठी घोषणा
हेही वाचा…राजकारण तापलं..,! पवारांवर केलेल्या टिकेवरून वळसे-पाटलांना अजित पवार गटाचा पाठिंबा, तर शरद पवार गटाकडून जोडेमारो आंदोलन
हेही वाचा…“काही जण डोळे वटारल्यावर पळून गेले, पण तुम्ही..,” धारकरांच्या प्रवेशावेळी ठाकरेंचा शिंदे-अजित पवारांवर हल्लाबोल