मुंबई : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली आज सह्याद्री अतिथीगृह येथे गिरणी कामगारांच्या प्रश्नांसंदर्भात बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. गिरणी कामगारांच्या घरांसाठी प्राप्त अर्जांची छाननी प्रक्रिया तीन महिन्यात पूर्ण करावी. मुंबईत घरे देता यावी याकरीता हौसिंग स्टॉक वाढविण्यासाठी आवश्यकता आहे. असं एकनाथ शिंदे यांनी म्हटलंय. त्यामुळे गिरीणी कामगारांना या निर्णयामुळे मोठा दिलासा मिळणार आहे.
हेही वाचा…“असली विधाने ऐकताना लोक बधिर होतात”, अंबादास दानवेंची भाजपच्या मंत्र्यांवर टिका
रांजगाळो, कोन-पनवेल येथील घरांची तातडीने दुरूस्ती करून पाच हजार घरांची लॉटरी प्रक्रिया पूर्ण करावी असे निर्देश देतानाच गेल्या अनेक वर्षापासून प्रलंबितल असलेल्या गिरणी कामगारांच्या घरांचा प्रश्न मार्गी लावत असल्याची घोषणा शिंदेंनी केली आहे.
हेही वाचा…शिंदे गटातील खासदाराच्या नावे बनावट लेटरहेड, सह्या करून १० कोटींची कामे मंजूर, राष्ट्रवादीच्या जिल्हा परिषदेच्या सदस्याला बेड्या
कोन-पनवेल येथील घरांची दुरुस्ती तातडीने पूर्ण करावी तसेच ठाणे राजगोळी येथील सदनिकांची दुरुस्ती एमएमआरडीएने तातडीने हाती घ्यावी जेणेकरून त्याठिकाणच्या पाच हजार घरांची लॉटरी काढण्यात येईल, असे यावेळी सांगितले. कोन, पनवेल येथील घरांची सोडत प्रक्रिया पूर्ण झाल्यास कामगारांना दसऱ्यापर्यंत सदनिकांची चावी देण्यासाठी प्रक्रिया पूर्ण करण्याचे यासमयी सांगितले.
हेही वाचा…“गडकरींनी इंडिया आघाडीत यावं, आम्ही गडकरींना पंतप्रधान केल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही”
दरम्यान, गिरणी कामगारांना, त्यांच्या वारसांना हक्काची घरे मिळाली पाहिजे ही सरकारची प्रामाणिक भूमिका असल्याचंही त्यांनी म्हटलंय. त्यासाठी कार्यवाहीला गती देण्यात आली असून गेल्या महिन्यात दोन टप्प्यात गिरणी कामगारांना सदनिकेची चावी वाटप करण्यात आली आहे. आतापर्यंत सुमारे १ लाख ७४ हजार अर्ज गिरणी कामगरा, त्यांच्या वारसांनी म्हाडाकडे केले असल्याची माहिती मुख्यमंत्र्यांनी दिलीय. त्याची छाननी प्रक्रिया अधिक गतिमान करण्याचे निर्देश दिले असून ही छाननी प्रक्रिया तीन महिन्यात पूर्ण करण्याचे निर्देश दिले आहेत. त्यामुळे पात्र- अपात्र संख्या निश्चित होऊ शकेल. असा विश्वासही एकनाथ शिंदे यांनी म्हटलंय.
READ ALSO :
हेही वाचा…राजकारण तापलं..,! पवारांवर केलेल्या टिकेवरून वळसे-पाटलांना अजित पवार गटाचा पाठिंबा, तर शरद पवार गटाकडून जोडेमारो आंदोलन
हेही वाचा…“काही जण डोळे वटारल्यावर पळून गेले, पण तुम्ही..,” धारकरांच्या प्रवेशावेळी ठाकरेंचा शिंदे-अजित पवारांवर हल्लाबोल
हेही वाचा…“एखाद्याला गुर्मी येते, तशी गुर्मी भाजपला येत गेली”, मित्र पक्षांच्या नेत्याचा भाजपवर जोरदार हल्लाबोल
हेही वाचा…“चंद्रकांत खैरेंचं वय वाढलं, पण राजकीय अक्कल काही वाढली नाही”
हेही वाचा…ठाकरेंना मोठा दिलासा..! मोठ्या प्रकरणात उद्धव ठाकरेंना कोर्टाकडून जामीन मंजूर