पालघर : पालघरचे शिवसेनेचे खासदार राजेंद्र गावित यांच्या नावे बनावट लेटरहेड तयार करून सुमारे १० कोटी रूपयांच्या कामाला मंजूरी मिळवण्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या प्रकरणात राष्ट्रवादी पक्षाला समर्थन देणार जिल्हा परिषद सदस्य तसेच जव्हार अर्बन बॅंकेचे चेअरमन हबीब शेख यांना जव्हार पोलिसांनी अटक देखील केली आहे.
हेही वाचा…लोकसभेत 45 पेक्षा अधिक जागा येतील ! भाजप आमदाराचा मोठा दावा
पालघर जिल्ह्यातील जव्हार व मोखाडा तालुक्यांमधून जव्हार- मोखाडा- त्र्यंबकेश्वर तसेच मोखाडा- विहिगाव- खोडाळा असे दोन प्रमुख मार्ग असून या मार्गांवर गेल्या काही वर्षांत किमान ४०० ते ५०० कोटी रुपयांची कामे झाली आहेत. अशा परिस्थितीत हबीब शेख यांनी खासदार यांचे लेटरहेड छापून मोखाडा- विहिगाव- खोडाळा या भागात सुमारे १० कोटी रुपये किमतीच्या कामांना नव्याने मंजुरी मिळवली. या कामांना अर्थसंकल्पीय मंजुरी मिळून प्रसिद्ध झाल्यानंतर ही बाब खासदारांच्या निदर्शनास आली.
हेही वाचा…“तुम्ही सत्तेसाठी निष्ठा फार विकून खाल्ली”, वळसे पाटलांवर आव्हाडांची खरमरीत टिका
याप्रकरणी खासदार गावित यांनी चौकशी केल्यानंतर बनावट लेटरहेडसह त्यांच्या खोट्या सह्या, राजमुद्राचा गैरवापर केल्याचे उघडकीस आले असून या प्रकरणात खासदारांचे स्वीय सहाय्य यांच्या माध्यमातून पालघरच्या पोलीस अधीक्षक कार्यालयात दोन दिवसांपूर्वी तक्रार दाखल करण्यात आली होती. या प्रकरणात जव्हार पोलिसांनी हबीब शेख यांना मध्यरात्रीनंतर अटक केली असल्याचे पोलिसांनी सांगितले आहे.
READ ALSO :
हेही वाचा…“गडकरींनी इंडिया आघाडीत यावं, आम्ही गडकरींना पंतप्रधान केल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही”
हेही वाचा…भुजबळांच्या कानाखाली लावेल, त्याला १ लाखांचं बक्षिस, भुजबळांच्या सुरक्षेत वाढ, कोणी केली घोषणा ?
हेही वाचा…संजय राऊत लोकसभा निवडणुक लढवणार, म्हणाले, “दोन ते सव्वा लाख मतांनी सहज…,”
हेही वाचा…“शरद पवारांनी ज्यांच्यावर विश्वास टाकला, ताकद दिलीत आता तेच..,” वळसे पाटलांवर रोहित पवारांची जोरदार टिका
हेही वाचा…“ऐश्वर्या रॉय रोज मासे खाते म्हणून तिचे डोळे सुंदर, तुम्हीही खा..”, भाजप मंत्र्यांचं अजब विधान