मुंबई : महाराष्ट्राच्या राजकारणात सर्वात जास्त चर्चेत असलेले शिवसेनेचे खासदार संजय राऊत आगामी लोकसभा निवडणुक लढविणार असल्याच्या बातम्या समोर येत आहेत. यावर पक्षाने आदेश दिला तर निवडणुक लढविण्यासाठी तयार आहे असं म्हणत राऊतांनी देखील या गोष्टीला दुजोरा दिला आहे. तर भाजप आमदार नितेश राणे यांनी यावरून संजय राऊतांना डिवचलं आहे.
हेही वाचा…धनंजय मुंडेंचा दिलदारपणा..! ‘त्या’ चार मुलींच्या शिक्षणाची जबाबदारी घेतली
राज्यात महायुती सरकार आल्यानंतर संजय राऊतांंनी शिंदे गटातील आमदारांवर सातत्याने टिका करीत आहेत. यातच शिंदे गटाकडून राऊतांनी जनतेतून निवडणुक लढवून दाखवावं, असं चॅलेंज दिलं जात आहेत. यातच आता मुंबईतील इशान्य भागातून राऊत लोकसभा निवडणुक लढविणार असल्याचं सांगितलं जात आहे. याठिकाणी भाजपचा खासदार असून राऊतांना उमेदवारी देण्यात येईल का ? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.
हेही वाचा…“सत्ता गेली तर ते आमदार कुठेही दिसणार नाही, जनता शरद पवार अन् ठाकरेंच्या सोबत”, मित्र पक्षांनीच भाजपला डिवचलं
दरम्यान, पक्षाची गरज व पक्षप्रमुखांचा आदेश जो असेल तो मानणाऱ्यांपैकी मी आहे. मला विचारलं ईशान्य मुंबईतून तुम्ही निवडणुक लढवणार का? मी म्हटलं पक्षानं आदेश दिला तर मी काहीही करीन. ईशान्य मुंबईत संजय राऊत सोडून द्या, आमचा साधा शिवसैनिक जरी निवडणुकीला उभा राहिला, तरी तो दोन ते सव्वादोन लाख मतांनी निवडून येईल अशी स्थिती आहे. तो शिवसेनेचा बालेकिल्ला आहे. तिथे सातत्याने शिवसेनेच्या सहकाऱ्याने भाजपचे खासदार निवडून आले आहेत. अस राऊतांनी म्हटलंय.
READ ALSO :
हेही वाचा…“शरद पवारांनी ज्यांच्यावर विश्वास टाकला, ताकद दिलीत आता तेच..,” वळसे पाटलांवर रोहित पवारांची जोरदार टिका
हेही वाचा…“ऐश्वर्या रॉय रोज मासे खाते म्हणून तिचे डोळे सुंदर, तुम्हीही खा..”, भाजप मंत्र्यांचं अजब विधान
हेही वाचा…लोकसभेत 45 पेक्षा अधिक जागा येतील ! भाजप आमदाराचा मोठा दावा
हेही वाचा…“तुम्ही सत्तेसाठी निष्ठा फार विकून खाल्ली”, वळसे पाटलांवर आव्हाडांची खरमरीत टिका
हेही वाचा…“ज्यांचे फोटो लावतो, त्यांनी किती शाळा केल्या? आपण आपले देव ओळखायला शिका”