मुंबई : अनेक राज्यातील प्रादेशिक पक्ष पुढे जात आहेत. आपल्याकडे शरद पवारांसारखे उत्तुंग नेते आहेत. मात्र आपले फक्त ६० ते ७० आमदार निवडून येतात. नंतर कोणाशी तरी आघाडी करावी लागते असं मंत्री दिलीप वळसे पाटल यांनी म्हटलं आहे. त्यावर आता राष्ट्रवादीच्या शरद पवार गटाने दिलीप वळसे पाटलांवर कडाडून टिका केलीय.
हेही वाचा…“ब्राम्हण, समाजात संभाजी, शिवाजी नाव ठेवत नाहीत, भिडेंनी मुद्दाम संभाजी नाव ठेवलंय”
वळसे-पाटील यांची झालेली नैतिक अधोगती पाहून वाईट वाटले. शरद पवारांचा सर्वात विश्वासू साथीदार आणि शरद पवारांच्या लेखी अत्यंत हुशार असणारा हा माणुस प्रत्यक्षात मात्र अत्यंत कृतघ्न निघाला. शरद पवारांच्या नजरेने या माणसातील हा गुण कसा काय हेरला नाही, याच आश्चर्च वाटते. त्यांनी घडवलेल्या दुसऱ्या फळीतील बहुतांशी नेत्यांनी आता आपली निष्ठा ही सत्तेसाठी फार विकून खाल्ली आहे. बाजूच्या मतदार संघात आमदार निवडून आणू शकले नाही. त्याबद्दल काही वाईट वाटत नाही. अशी टिका राष्ट्रवादीचे नेते आणि माजी मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी केलीय.
हेही वाचा…अभिनेत्री दिपाली सय्यद निवडणुक लढवणार, शिंदे तिकीट देणार
दरम्यान, देशात शरद पवार यांच्या उंचीचा नेता कोणीही नाही. पण महाराष्ट्रातील जनतेनं शरद पवार यांना बहुमत दिलं नाही, शरद पवार यांना एकदाही स्वबळावर मुख्यमंत्री होता आलं नाही. ममता बॅनर्जी, मायावती स्वबळावर मुख्यमंत्री झाल्या. असंही त्यांनी म्हटलंय.
हा व्हिडिओ पाहिला आणि वळसे पाटील यांची झालेली नैतिक अधोगती पाहून वाईट वाटले.साहेबांचा सर्वात विश्वासू साथीदार,साहेबांच्या लेखी अत्यंत हुशार असणारा हा माणूस,प्रत्यक्षात मात्र अत्यंत कृतघ्न निघाला.साहेबांच्या नजरेने या माणसातील हा गुण कसा काय हेरला नाही,याच आश्चर्य वाटते.साहेबांनी… pic.twitter.com/ApxgzcvTuJ
— Dr.Jitendra Awhad (@Awhadspeaks) August 20, 2023
READ ALSO :
हेही वाचा…“ज्यांचे फोटो लावतो, त्यांनी किती शाळा केल्या? आपण आपले देव ओळखायला शिका”
हेही वाचा…धनंजय मुंडेंचा दिलदारपणा..! ‘त्या’ चार मुलींच्या शिक्षणाची जबाबदारी घेतली
हेही वाचा…“सत्ता गेली तर ते आमदार कुठेही दिसणार नाही, जनता शरद पवार अन् ठाकरेंच्या सोबत”, मित्र पक्षांनीच भाजपला डिवचलं
हेही वाचा…“प्रियंका गांधी वाराणसीतून लोकसभा निवडणुक लढतील आणि जिंकतील”
हेही वाचा…“बाकी बरनॉलचा स्टॉक असेलच, तळपायाला लावा”, अंबादास दानवेंचा चंद्रशेखर बावनकुळेंना खोचक टोला