मुंबई : महाविकास आघाडीतील अर्थमंत्री अजित पवार यांच्यामुळे गोची होत असल्याचं कारण देत एकनाथ शिंदे यांच्यासह शिवसेनेचे ४० आमदार सत्तेबाहेर पडले. त्यानंतर भाजपने एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्री पद दिलं. तर इतर सेनेच्या ९ आमदारांना मंत्रिपद दिलं. यानंतर अनेक कार्यकर्ते, पदाधिकारी, आमदार, खासदारांनी ठाकरेंची साथ सोडत शिंदेंच्या सेनेत प्रवेश केला. यात दिपाली सय्यद यांनी देखील शिंदेंच्या सेनेत प्रवेश केला.
हेही वाचा…“नवाब मलिकांवरील केस मागे घेणार नाही, ” मलिकांच्या ‘त्या’ केसबद्दल भाजप नेत्याचं स्पष्टीकरण
सुरूवातीला एकनाथ शिंदे यांनी सर्व नाराजी विसरून ठाकरेंसोबत यावं, अशी मागणी दिपाली सय्यद यांनी केली. त्यानंतर सुषमा अंधारे यांनी ठाकरे गटात प्रवेश केला. अन् त्यांना ठाकरेंनी उपनेते पद दिलं. त्यानंतर ठाकरे गटात असलेल्या अनेक महिला यामुळे नाराज झाल्या. यामध्ये दिपाली सय्यद यांचं नाव देखील होतं. यातच आता आगामी निवडणुकीसाठी दिपाली सय्यद यांना तिकिट देण्यात येणार असल्याचं म्हटलं जात आहे.
हेही वाचा…“रामदास कदम आम्हाला शिवीगाळ करतात, त्यांना हटवा अन्यथा..,” शिवसेनेच्या नेत्यांची शिंदेंकडे कैफियत
दरम्यान, दिपाली सय्यद लोकसभा किंवा विधानसभा लढवण्याच्या तयारीत आहे. त्याबद्दल दिपीली सय्यद म्हणाल्या. की मी शिवसेनामध्ये आहे, मला पक्षप्रवेशाची गरज नाही. कुठून निवडणुक लढवणार याचा शोध सुरू आहे.
READ ALSO :
हेही वाचा…“सप्टेंबर महिना हा राज्यामध्ये सत्ताबदल घेऊन येईल, मुख्य खुर्ची बदलणार “
हेही वाचा…बीडची उत्तर सभा होणारच, अजित पवार भाषण करणार, धनंजय मुंडेंचं स्पष्टीकरण
हेही वाचा…“मनसेने टोलनाके व गाड्या फोडण्यापेक्षा खड्डे बुजवण्याची मोहिम घ्यावी,” दिपाली सय्यदचा खोचक टोला
हेही वाचा…“अजित पवार-शरद पवारांची ‘ती’ भेट राजकीय नाही तर..,” मोठं कारण आलं समोर
हेही वाचा…“त्यामुळेच शरद पवारांच्या सभेनंतर २७ ऑगस्टची अजित पवारांची उत्तरसभा सभा रद्द”, कारण आलं समोर