बीड : राष्ट्रवादी पक्षात झालेल्या बंडखोरीनंतर शरद पवार विरूद्ध अजित पवार असे दोन गट बघायला मिळत आहेत. यातच शरद पवार यांच्याकडून अजित पवार गटाच्या महत्वाच्या नेत्यांच्या जिल्ह्यात जाहीर सभा होत आहे. तर बीडमध्ये देखील शरद पवारांची १७ ऑगस्ट रोजी सभा झाली. त्याला उत्तर सभा अजित पवार गटाकडूनं येत्या २७ ऑगस्ट रोजी घेण्यात येणार होती. मात्र, अजित पवारांची सभा रद्द करण्यात आल्याची माहिती आली आहे. परंतु ही माहिती कृषी मंत्री धनंजय मुंडे यांनी फेटाळून लावली आहे.
हेही वाचा…“वैफल्यगस्त, महापेरू, फडणवीस सांभाळा, अहंकाराचा पिळ, बोरूबहाद्दर,” भाजप अन् ठाकरे गटात शाब्दिक चकमक
२७ तारखेला होणारी बीड येथील अजित पवार गटाची सभा होणार असल्याचं धनंजय मुंडे यांनी म्हटलं आहे. याबाबत धनंजय मुंडे यांनी ट्विट करत माहिती दिली आहे. तसेच या सभेला अजित पवार यांच्यासह पक्षाचे वरिष्ठ नेते मार्गदर्शन करणार आहेत. ही सभा रद्द झाल्याबद्दल माध्यमांवर येणाऱ्या बातम्या पूर्णपणे चुकीच्या असून माध्यम प्रतिनिधींनी कृपया खात्री केल्याशिवाय सभेबद्दल अशा चुकीच्या व निराधार बातम्या देऊ नयेत. असंही मुंडेंनी म्हटलं.
हेही वाचा…“स्पेशल ८०” महाराष्ट्रातले आमदार करणार भाजपसाठी सर्व्हे, तगडी फौज मध्य प्रदेश, राजस्थान अन् तेलंगणात दाखल
दरम्यान, आता अजित पवार गटाच्या झालेल्या एका बैठकित यावर चर्चा झाली. ज्यात. शरद पवारांनी कोणतेही टिका केली नसतांना त्यांना उत्तर काय देणार ? यावर चर्चा झाली. त्यामुळे २७ ऑगस्ट रोजी बीडमध्ये होणारी अजित पवारांची उत्तर सभा रद्द होण्याची शक्यता सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार समजत आहे. परंतु ही सभा आता नियोजित तारखेला होणार असल्याचं मुंडेंनी म्हटलंय.
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची बीड येथे दिनांक 27 ऑगस्ट रोजी जाहीर सभा होणार असून या सभेला उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्यासह पक्षाचे वरिष्ठ नेते मार्गदर्शन करणार आहेत. ही सभा रद्द झाल्याबाबत माध्यमांवर येणाऱ्या बातम्या पूर्णपणे चुकीच्या असून माध्यम प्रतिनिधींनी कृपया खात्री…
— Dhananjay Munde (@dhananjay_munde) August 19, 2023
READ ALSO :
हेही वाचा…“मनसेने टोलनाके व गाड्या फोडण्यापेक्षा खड्डे बुजवण्याची मोहिम घ्यावी,” दिपाली सय्यदचा खोचक टोला
हेही वाचा…“अजित पवार-शरद पवारांची ‘ती’ भेट राजकीय नाही तर..,” मोठं कारण आलं समोर
हेही वाचा…“त्यामुळेच शरद पवारांच्या सभेनंतर २७ ऑगस्टची अजित पवारांची उत्तरसभा सभा रद्द”, कारण आलं समोर
हेही वाचा…“नवाब मलिकांवरील केस मागे घेणार नाही, ” मलिकांच्या ‘त्या’ केसबद्दल भाजप नेत्याचं स्पष्टीकरण
हेही वाचा…“रामदास कदम आम्हाला शिवीगाळ करतात, त्यांना हटवा अन्यथा..,” शिवसेनेच्या नेत्यांची शिंदेंकडे कैफियत