मुंबई : मनी लॉंर्डिंग प्रकरणातून दोन महिन्यासाठी वैद्यकीय जामीन मंजुर झालेल्या राष्ट्रवादीच्या नवाब मलिकांवरील केस मागे घेणार नसल्याचं भाजप नेते मोहित कंबोज यांनी म्हटलं आहे. २०२१ मध्ये कोरोना काळात नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी मलिक यांच्याविरोधात मोहित कंबोज यांनी तक्रार केली होती. आता अजित पवार यांच्यासह राष्ट्रवादीचा एक गट सत्तेत सामील झाला आहे. त्यानंतरही आता आपल्या सहकाऱ्याच्या विरोधातील तक्रा मागे घेणार का? यावर मोहित कंबोज यांनी आपली प्रतिक्रिया दिलीय.
हेही वाचा…अजित पवार गट राज्यात सक्रीय, ३६ जिल्ह्यांची जबाबदारी राष्ट्रवादीच्या ‘१०’ मोठ्या नेत्यांवर
२०२१ मध्ये नवाब मलिक यांनी कोरोना नियमांचं उल्लंघन करत शिवडी कोर्टात हजेरी लावल्याप्रकरणी ही तक्रार केली होती. या प्रकरणी कंबोज यांनी कोर्टात विनंती अर्ज केला असल्याच्या चर्चा सुरू आहेत. यावर आता भाजपनेते मोहित कंबोज यांनी स्पष्टिकरण दिलं आहे.
हेही वाचा…मोठी बातमी…! महाराष्ट्राचे ५० तडपदार आमदार मध्यप्रदेश विधानसभा निवडणुकीसाठी ५० उमेदवार ठरवणार
दरम्यान, नवाब मलिक यांच्या विरोधातील एकही केस मी पाठिमागे घेतलेली नाही, कोणीही खोट्या बातम्या आणि अफवांवर विश्वास ठेवू नये. मलिक यांच्याविरोधातील माझे काम सुरूच राहणार आहे. कोर्टात या संदर्भात तारखा सुरू आहेत.त्यांच्याविरोधातील मानहानीच्या सर्व केस मी काढून घेतलेल्या नाहीत, असंही भाजप नेते मोहित कंबोज म्हणाले.
READ ALSO :
हेही वाचा…“रामदास कदम आम्हाला शिवीगाळ करतात, त्यांना हटवा अन्यथा..,” शिवसेनेच्या नेत्यांची शिंदेंकडे कैफियत
हेही वाचा…“वैफल्यगस्त, महापेरू, फडणवीस सांभाळा, अहंकाराचा पिळ, बोरूबहाद्दर,” भाजप अन् ठाकरे गटात शाब्दिक चकमक
हेही वाचा…“स्पेशल ८०” महाराष्ट्रातले आमदार करणार भाजपसाठी सर्व्हे, तगडी फौज मध्य प्रदेश, राजस्थान अन् तेलंगणात दाखल
हेही वाचा…महाराष्ट्रातील आमदार सर्वात मालमाल…! सर्वात जास्त संपत्ती असणाऱ्यांमध्ये महाराष्ट्र २ क्रमांकावर, अनेकजण कोट्यावधीचे मालक
हेही वाचा…“बारामतीत सुप्रिया सुळे यांना ताकद द्या, साथ द्या,” उद्धव ठाकरेंच्या कार्यकर्त्यांना सूचना