कांदिवली : शिवसेनेचे नेते व माजी मंत्री रामदास कदम यांच्या मुलाच्या मनमानी कारभाराला कंटाळून कांदिवली, चारकोप आणि मालाड येथील ४० पदाधिकाऱ्यांनी गेल्याच आठवड्यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे राजीनामे सुपूर्द केल्याचा प्रकार ताजा असतानाच आता पुन्हा एकदा शिवसेनेत नाराजी यावेळी पदाधिकाऱ्यांनी आपली कैफियत मांडली. यामुळे राजकारणात याची चर्चा आता सर्वदूर पसरली आहे.
हेही वाचा…मोठी बातमी…! महाराष्ट्राचे ५० तडपदार आमदार मध्यप्रदेश विधानसभा निवडणुकीसाठी ५० उमेदवार ठरवणार
रामदास कदम आम्हाला शिवीगाळ करतात, तुम्हाला पक्षातून काढून टाकेल असा दम देतात, असे सांगत त्यांना हटवा अन्यथा आम्ही राजीनामे देतो, असे या पदाधिकाऱ्यांनी मुख्यमंत्र्यांना सांगितले. त्यावर शिंदे यांनी तक्रारीची दखल घेत राजीनामे न देण्याचे आवाहन पदाधिकाऱ्यांना केले. शिवसेना नेते व उत्तर पश्चिम लोकसभा मतदार संघाचे खासदार गजानन कीर्तिकर यांनी या वृत्ताला दुजोरा दिला आहे.
हेही वाचा…“गृहमंत्र्यांनी पक्ष फोडणे बंद करुन पेपर फोडणाऱ्यांचे कंबरडे मोडावे”
दरम्यान, मंत्रालयात सातव्या मजल्यावर मंत्रिमंडळ बैठक संपल्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि पर्यटनमंत्री गिरीश महाजन यांच्यात तब्बल ४५ मिनिटे बंद दाराआड चर्चा झाली. यावेळी दालनाबाहेर शिंदे गटाच्या आमदारांसह काही मंत्री आणि इतर पक्षांचे आमदारही ताटकळत उभे होते. मात्र, शिंदे आणि महाजन यांच्यात चर्चा सुरूच होती.
हेही वाचा…“..त्यामुळे भाजपबरोबर गेलेला कोणताही लोकनेता टिकू शकत नाही”, रोहित पवारांची भाजपवर जहरी टिका
यावेळी मुख्यमंत्र्यांच्या खासगी सचिवांसह सर्वांना बाहेर ठेवण्यात आले होते. यात डझनभर आमदारही मुख्यमंत्र्यांच्या भेटीसाठी अॅन्टी चेंबरच्या बाहेर उभे होते. बैठक आटोपल्यावर मुख्यमंत्री कार्यालयात गेले. त्यामुळे तिथे थांबलेल्या आमदारांना आश्चर्याचा धक्का बसला. मात्र, यावेळी मुख्यमंत्री कार्यालयातील एका अधिकाऱ्याने सर्व आमदारांकडून निवेदन घेऊन मुख्यमंत्री शिंदे यांच्याकडे पाठवली.
READ ALSO :
हेही वाचा…“वैफल्यगस्त, महापेरू, फडणवीस सांभाळा, अहंकाराचा पिळ, बोरूबहाद्दर,” भाजप अन् ठाकरे गटात शाब्दिक चकमक
हेही वाचा…“स्पेशल ८०” महाराष्ट्रातले आमदार करणार भाजपसाठी सर्व्हे, तगडी फौज मध्य प्रदेश, राजस्थान अन् तेलंगणात दाखल
हेही वाचा…महाराष्ट्रातील आमदार सर्वात मालमाल…! सर्वात जास्त संपत्ती असणाऱ्यांमध्ये महाराष्ट्र २ क्रमांकावर, अनेकजण कोट्यावधीचे मालक
हेही वाचा…“बारामतीत सुप्रिया सुळे यांना ताकद द्या, साथ द्या,” उद्धव ठाकरेंच्या कार्यकर्त्यांना सूचना
हेही वाचा…अजित पवार गट राज्यात सक्रीय, ३६ जिल्ह्यांची जबाबदारी राष्ट्रवादीच्या ‘१०’ मोठ्या नेत्यांवर