बीड : राष्ट्रवादी पक्षात झालेल्या बंडखोरीनंतर शरद पवार विरूद्ध अजित पवार असे दोन गट बघायला मिळत आहेत. यातच शरद पवार यांच्याकडून अजित पवार गटाच्या महत्वाच्या नेत्यांच्या जिल्ह्यात जाहीर सभा होत आहे. तर बीडमध्ये देखील शरद पवारांची १७ ऑगस्ट रोजी सभा झाली. त्याला उत्तर सभा अजित पवार गटाकडूनं येत्या २७ ऑगस्ट रोजी घेण्यात येणार होती. मात्र, अजित पवारांची सभा रद्द करण्यात आल्याची माहिती आली आहे.
हेही वाचा…“बारामतीत सुप्रिया सुळे यांना ताकद द्या, साथ द्या,” उद्धव ठाकरेंच्या कार्यकर्त्यांना सूचना
शरद पवारांच्या बीडमधील सभेच्या पार्श्वभूमीवर देवगिरी बंगल्यावर उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासोबत वरिष्ठ पातळीवरील नेत्यांची चर्चा झाली होती. त्यानंतर शरद पवारांच्या सभेनंतर उत्तर सभा घेण्याचे ठरवले होते. त्यामुळे शरद पवारांच्या बीडच्या सभेनंतर उत्तर सभेचं धनंजयम मुंडे यांच्यावतीने आयोजन करण्यात येणार होते. मात्र, बीडच्या सभेत शरद पवारांनी आपल्या भाषणात अजित पवार किंवा धनंजय मुंडे यांच्यावर टिका करण्याचे टाळले.
हेही वाचा…अजित पवार गट राज्यात सक्रीय, ३६ जिल्ह्यांची जबाबदारी राष्ट्रवादीच्या ‘१०’ मोठ्या नेत्यांवर
दरम्यान, आता अजित पवार गटाच्या झालेल्या एका बैठकित यावर चर्चा झाली. ज्यात. शरद पवारांनी कोणतेही टिका केली नसतांना त्यांना उत्तर काय देणार ? यावर चर्चा झाली. त्यामुळे २७ ऑगस्ट रोजी बीडमध्ये होणारी अजित पवारांची उत्तर सभा रद्द होण्याची शक्यता सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार समजत आहे.
READ ALSO :
हेही वाचा…“नवाब मलिकांवरील केस मागे घेणार नाही, ” मलिकांच्या ‘त्या’ केसबद्दल भाजप नेत्याचं स्पष्टीकरण
हेही वाचा…“रामदास कदम आम्हाला शिवीगाळ करतात, त्यांना हटवा अन्यथा..,” शिवसेनेच्या नेत्यांची शिंदेंकडे कैफियत
हेही वाचा…“वैफल्यगस्त, महापेरू, फडणवीस सांभाळा, अहंकाराचा पिळ, बोरूबहाद्दर,” भाजप अन् ठाकरे गटात शाब्दिक चकमक
हेही वाचा…“स्पेशल ८०” महाराष्ट्रातले आमदार करणार भाजपसाठी सर्व्हे, तगडी फौज मध्य प्रदेश, राजस्थान अन् तेलंगणात दाखल
हेही वाचा…महाराष्ट्रातील आमदार सर्वात मालमाल…! सर्वात जास्त संपत्ती असणाऱ्यांमध्ये महाराष्ट्र २ क्रमांकावर, अनेकजण कोट्यावधीचे मालक