नाशिक : संभाजी भिडे यांचं नाव मनोहर कुलकर्णी असून, लोकांमध्ये संभ्रम निर्माण केला जातो. खरेतर ब्राम्हण समाजाने वाईट वाटून घेऊन नये. पण ब्राम्हण, समाजात संभाजी, शिवाजी नाव ठेवत नाहीत. मात्र मुद्दामून संभाजी भिडे हे नाव ठेवण्यात आलं अशी टिका छगन भुजबळ यांनी केली. तसेच काही जणांना सरस्वती तर काहींना शारदा आवडते. पण महात्मा फुले, सावित्रीबाई फुले, राजर्षी शाहू महाराज, डॉ.बाबासाहेब आंबेडकर, कर्मवीर भाऊराव पाटील या महापुरूषांनी आमच्यासाठी शिक्षणाची दारे खुली केली. असं म्हटल्यानंतर आता मराठा समाज भुजबळांच्या विरोधात आक्रमक झाला आहे.
हेही वाचा…“ज्यांचे फोटो लावतो, त्यांनी किती शाळा केल्या? आपण आपले देव ओळखायला शिका”
जो तरूण छगन भुजबळ यांच्या कानाखाली मारेल, त्याला एक लाख रूपयांचे बक्षीस देऊ, अशी घोषणा परशुराम सेवा संघाचे प्रदेशाध्यक्ष विश्वजीत देशपांडे यांनी केलीय. यापुर्वीही भुजबळांनी देवी सरस्वतीवर वादग्रस्त विधान केले होते. यावेळी त्यांनी माफि मागितली होती. ते सातत्याने हिंदू समाजात तेढ निर्माण करणारी वक्तव्य करीत आहे. विशिष्ट समाजाचा विरोधात गरळ ओकतायेत.. त्यांनी कोणाची पुजा करावी हा त्यांचा प्रश्न आहे. परंतु समाजात तेढ निर्माण करू नये असंही देशपांडे यांनी म्हटलं.
हेही वाचा…धनंजय मुंडेंचा दिलदारपणा..! ‘त्या’ चार मुलींच्या शिक्षणाची जबाबदारी घेतली
दरम्यान, विश्वजीत देशपांडे यांनी भुजबळांच्या कानाखाली मारेल त्याला १ लाखांची घोषणा केल्यानंतर त्यांच्या सुरक्षेत वाढ करण्यात आली आहे. तर महायुती सरकारमध्ये सामील झाल्यानंतर माझी भूमिका मी बदलेन असं तुम्हाला वाटत असेल तर ते चुक आहे.असं म्हणत आपल्या भूमिकेबाबत मी ठाम आहे. परंतु कोणत्याही समाजाचा अपमान होणार नाही. यासाठी मी वक्तव्य केले नाही. असं भुजबळांनी म्हटलंय.
READ ALSO :
हेही वाचा…संजय राऊत लोकसभा निवडणुक लढवणार, म्हणाले, “दोन ते सव्वा लाख मतांनी सहज…,”
हेही वाचा…“शरद पवारांनी ज्यांच्यावर विश्वास टाकला, ताकद दिलीत आता तेच..,” वळसे पाटलांवर रोहित पवारांची जोरदार टिका
हेही वाचा…“ऐश्वर्या रॉय रोज मासे खाते म्हणून तिचे डोळे सुंदर, तुम्हीही खा..”, भाजप मंत्र्यांचं अजब विधान
हेही वाचा…लोकसभेत 45 पेक्षा अधिक जागा येतील ! भाजप आमदाराचा मोठा दावा
हेही वाचा…“तुम्ही सत्तेसाठी निष्ठा फार विकून खाल्ली”, वळसे पाटलांवर आव्हाडांची खरमरीत टिका