धुळे : राज्यात मागील तीन ते चार वर्षापासून आपल्या वादग्रस्त वक्तव्यावरून सरकार मधील मंत्री अडचणीत आले आहेत. महायुतीचं सरकार आल्यानंतर अनेक मंत्र्यांनी वादग्रस्त वक्तव्य करून विनाकारण वाद ओढवून घेतला आहे. अशातच आता महायुती सरकारमधील आदिवासी विकास मंत्री विजय कुमार गावित यांनी अशाच पद्धतीचं विधान केल्याने वाद होण्याची शक्यता आहे. यावरून आता विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी जोरदार टिकास्त्र सोडलं आहे.
हेही वाचा…“ऐश्वर्या रॉय रोज मासे खाते म्हणून तिचे डोळे सुंदर, तुम्हीही खा..”, भाजप मंत्र्यांचं अजब विधान
वाचाळवीरांच्या पंगतीत अजून एक नाव आता मंत्री विजयकुमार गावित यांचे लागले आहे. महापुरूषांची बदनामी करण्यात कोणतीही कसर न सोडणाऱ्या भाजप नेत्यांना अभय मिळाले म्हणूनच आता महिलांवरही यांची जीभ घसरू लागलीय. भक्त आणि उठसुठ शिवसेनेवर तोंडसुख घेणाऱ्या भाजपच्या प्रत्येकवेळी महिला अत्याचारावर भूमिका घेणाऱ्या मंडळींचे काम मात्र असली विधाने ऐकताना बधिर होतात असा निशाणा अंबादास दानवेंनी साधलाय.
हेही वाचा…लोकसभेत 45 पेक्षा अधिक जागा येतील ! भाजप आमदाराचा मोठा दावा
दरम्यान, धुळे जिल्ह्यातील अंर्तूला येथे आदिवासी मच्छीमार बांधवांना मासेमारीचे साहित्य वाटप करण्यात आले होते. यावेळी विजय कुमार यांनी हे विधान केले आहे. त्यावेळी व्यासपीठावर डॉ. सुप्रिया गावितही उपस्थित होत्या. दररोज मासे खाल्ल्यामुळेच अभिनेत्री ऐश्वर्या रॉय हिचे डोळे सुंदर आहेत. तुम्हीही दररोज मासे खाल्ले की तुमचेही डोळे सुंदर होतील, अन् जिला पटवायचे तिला पटवूनच घ्याल असे वक्तव्य विजयकुमार गावित यांनी केले आहे.
वाचाळवीरांच्या पंगतीत अजून एक नाव आता मंत्री विजयकुमार गावित यांचे लागले आहे. महापुरुषांची बदनामी करण्यात कोणतीही कसर न सोडणाऱ्या भाजप नेत्यांना अभय मिळाले म्हणूनच आता महिलांवरही यांची जीभ घसरू लागली आहे. भक्त आणि उठसुठ शिवसेनेवर तोंडसुख घेणाऱ्या भाजपच्या प्रत्येकवेळी महिला… pic.twitter.com/DQTqgvCJTo
— Ambadas Danve (@iambadasdanve) August 21, 2023
READ ALSO :
हेही वाचा…शिंदे गटातील खासदाराच्या नावे बनावट लेटरहेड, सह्या करून १० कोटींची कामे मंजूर, राष्ट्रवादीच्या जिल्हा परिषदेच्या सदस्याला बेड्या
हेही वाचा…“गडकरींनी इंडिया आघाडीत यावं, आम्ही गडकरींना पंतप्रधान केल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही”
हेही वाचा…भुजबळांच्या कानाखाली लावेल, त्याला १ लाखांचं बक्षिस, भुजबळांच्या सुरक्षेत वाढ, कोणी केली घोषणा ?
हेही वाचा…संजय राऊत लोकसभा निवडणुक लढवणार, म्हणाले, “दोन ते सव्वा लाख मतांनी सहज…,”
हेही वाचा…“शरद पवारांनी ज्यांच्यावर विश्वास टाकला, ताकद दिलीत आता तेच..,” वळसे पाटलांवर रोहित पवारांची जोरदार टिका