मुंबई : आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर आता राज्यातील नेते विविध पक्षात प्रवेश करीत आहेत. यातच आज माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत पेण नगरपालिकेचे माजी नगराध्यक्ष शिशिर धारकर यांनी शिवसेना ठाकरे गटात प्रवेश केला. यावेळी ठाकरेंनी भाजपसह अजित पवार, एकनाथ शिंदे यांच्यावर कडाडून टिकास्त्र सोडलं.
हेही वाचा…“गडकरींनी इंडिया आघाडीत यावं, आम्ही गडकरींना पंतप्रधान केल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही”
आज शिशिर धारकर यांच्यासह मिहीर धारकर, माजी नगरसेवक समीर म्हात्रे यांनी त्यांच्या कार्यकर्त्यांसह शिवसेनेत प्रवेश केला. यावेळी ठाकरे बोलतांना म्हणाले की, तुम्ही लढवय्यांच्या सेनेत आलात. मात्र, आव आणणारे काही जण डोळे वटारल्यावर पळून गेले आहेत. डोळे वटारले की पळून गेले. पण तुम्ही पळपुटे नाहीत, याचा मला अभिमान आहे. शेवटी अन्यायावर वार करणं आपली ख्याती आहे.
हेही वाचा…भुजबळांच्या कानाखाली लावेल, त्याला १ लाखांचं बक्षिस, भुजबळांच्या सुरक्षेत वाढ, कोणी केली घोषणा ?
दरम्यान, शिशिर धारकर यांंचं कौतूक केलं पाहिजे. त्यांच्याकडे वॉशिंग मशीमध्ये जाण्याचाही सोपा पर्याय होता. मात्र धारकर लढवय्यांच्या शिवसेनेत आले आहेत. संपूर्ण चांदा ते बांदा आपल्याला बदल करायला आहे. सत्तेपुढे शहाणपण टिकत नाही म्हणतात, पण आपल्याला शहाणपणाची सत्ता आपल्यालाल आणयाची आहे.तुम्हाला मूर्ख बनवलं जात आहे. मात्र हे जास्त काळ चालणार नाही. असंही त्यांनी म्हटलं.
READ ALSO :
हेही वाचा…“एखाद्याला गुर्मी येते, तशी गुर्मी भाजपला येत गेली”, मित्र पक्षांच्या नेत्याचा भाजपवर जोरदार हल्लाबोल
हेही वाचा…“चंद्रकांत खैरेंचं वय वाढलं, पण राजकीय अक्कल काही वाढली नाही”
हेही वाचा…ठाकरेंना मोठा दिलासा..! मोठ्या प्रकरणात उद्धव ठाकरेंना कोर्टाकडून जामीन मंजूर
हेही वाचा…“असली विधाने ऐकताना लोक बधिर होतात”, अंबादास दानवेंची भाजपच्या मंत्र्यांवर टिका
हेही वाचा…शिंदे गटातील खासदाराच्या नावे बनावट लेटरहेड, सह्या करून १० कोटींची कामे मंजूर, राष्ट्रवादीच्या जिल्हा परिषदेच्या सदस्याला बेड्या