पुणे : केंद्र सरकारने कांदा निर्यातीवर ४० टक्के निर्यात शुल्क लागू केल्यानंतर राज्यातील कांदा उत्पादक शेतकऱ्यांनी आक्रमक भूमिका घेतली आहे. मागील दोन दिवसापासून नाशिक येथील कांदा बाजारपेठाही बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. तर आज कृषी मंत्री धनंजय मुंडे यांनी केंद्रीय मंत्री पियुष गोयल यांची भेट घेतली तर जपानमधून राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केंद्रीय मंत्री अमित शहा आणि पियुष गोयल यांच्याशी फोनवरून संवाद साधला. याआधी राष्ट्रवादीचे खासदार अमोल कोल्हे यांनी पुण्यात आळेफाटा येथे आंदोलन करण्यात सुरूवात केलीय.
हेही वाचा…“काही जण डोळे वटारल्यावर पळून गेले, पण तुम्ही..,” धारकरांच्या प्रवेशावेळी ठाकरेंचा शिंदे-अजित पवारांवर हल्लाबोल
जोपर्यंत कांद्यावरील निर्यात शुल्क मागे घेतलं जात नाही. तसेच हमीभाव मागे घेतला जात नाही. तोपर्यंत केंद्रातला मंत्री महाराष्टात येईल. त्यांचं कांद्याची माळ घालूनच स्वागत करावं. जेणेकरून कांदा उत्पादक शेतकऱ्यांचं दु:ख केंद्रातल्या भाजपच्या मंत्र्यांना समजावं. असं अमोल कोल्हे यांनी म्हटलंय. आळेफाटा येथे केंद्र सरकारच्या विरोधात आंदोलन करतांना अमोल कोल्हे यांनी केंद्र सरकारला इशारा दिलाय.
हेही वाचा…“एखाद्याला गुर्मी येते, तशी गुर्मी भाजपला येत गेली”, मित्र पक्षांच्या नेत्याचा भाजपवर जोरदार हल्लाबोल
दरम्यान, राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी याबाबत ट्विट करत माहिती दिलीय. महाराष्ट्रातील कांदा उत्पादकांच्या प्रश्नासाठी आज आमचे नेते केंद्रीय मंत्री अमित शहा तसेच केंद्रीय मंत्री पियुष गोयल यांच्याशी जपानमधून दुरध्वनीवर संपर्क केला. केंद्र सरकारने २ लाख मेट्रिक टन कांदा खरेदी करण्याचा निर्णय घेतला असून महाराष्ट्रातील कांदा उत्पादकांचे हित जपण्यासाठी नाशिक आणि अहमदनगर येथे विशेष खरेदी केंद्र सुरू करण्यात येतील, अशी घोषणा त्यांनी केली आहे. २४१० प्रतिक्विंटल या दराने ही खरेदी करण्यात येईल. यातून मोठा दिलासा आपल्या राज्यातील कांदा उत्पादकांना मिळेल. असं फडणवीसांनी म्हटलंय. तर त्यानंतर केंद्रीय मंत्री पियुष गोयल यांनी देखील घोषणा केलीय.
READ ALSO :
हेही वाचा…“कांद्याने शेतकऱ्यांना रडवलं, अन् शेतकऱ्यांनी सरकारला,” केंद्र सरकारचा मोठा निर्णय
हेही वाचा…शरद पवारांची मोठी राजकीय खेळी, ३६ जिल्हांसाठी नेमले जिल्हा प्रभारी
हेही वाचा…“१५ वर्षापासून आमदार, ८ वर्ष मंत्री पद कोल्हापुरसाठी काय केलं ?” , महाडिकांनी सतेज पाटलांकडून हिशोब मागितला
हेही वाचा…मोठी बातमी…! गिरणी कामगारांसाठी एकनाथ शिंदे यांची मोठी घोषणा
हेही वाचा…राजकारण तापलं..,! पवारांवर केलेल्या टिकेवरून वळसे-पाटलांना अजित पवार गटाचा पाठिंबा, तर शरद पवार गटाकडून जोडेमारो आंदोलन