सांगली : महाराष्ट्र विधान परिषद निवडणूक २०२० च्या वेगवेगळ्या मतदारसंघात आता सर्वच पक्षांच्या उमेदवारांच्या नावांची घोषणा करण्यात आली आहे. पुणे, औरंगाबाद, नागपूर या पदवीधर आणि पुणे,अमरावती शिक्षक मतदारसंघासाठी उमेदवारी अर्ज भरण्याचा आज शेवटचा दिवस आहे.
भाजप, राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस, वंचित बहुजन आघाडीनं त्यांचे उमेदवार जाहीर केले असून यावेळीही काही जणांनी बंडखोरी करत अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत. उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा आज शेवटचा दिवस असल्यामुळं आजही उमेदवारी अर्ज दाखल होणार आहेत.
विधानपरिषद निवडणुकीत पदवीधर मतदारसंघातून औरंगाबाद विभागात राष्ट्रवादीचे सतीश चव्हाण तर पुणे विभागातून राष्ट्रवादीचे अरुण लाड यांना महाविकास आघाडीतर्फे उमेदवार म्हणून घोषित करण्यात येत आहे. दोन्ही उमेदवार या निवडणुकीत विजयी होतील, असा विश्वास पक्षाच्यावतीने जयंत पाटील यांनी यावेळी व्यक्त केला आहे.
राष्ट्रवादीने पुणे पदवीधर मतदारसंघात अरुण अण्णा लाड तर औरंगाबादमधून सतीश चव्हाण यांना उमेदवारी दिली आहे. राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी या जागांवरच्या उमेदवारांची घोषणा करतावेळीच लाड आणि चव्हाण यांच्या विजयाची खात्री व्यक्त केली. महाविकास आघाडीने आमच्यावर विश्वास दाखवला आहे, त्या विश्वासाला आम्ही पात्र राहू. येणाऱ्या काळात पदवीधरांचे प्रश्न मार्गी लावण्यासाठी आम्ही कटिबद्ध राहू, असा निर्धार अरुण लाड आणि सतिश चव्हाण यांनी बोलून दाखवला आहे.
अरुण अण्णा लाड यांचा थोडक्यात परिचय
राष्ट्रवादीचे नेते अरुण अण्णा लाड यांना पुणे विधानपरिषदेच्या पदवीधर मतदारसंघातून राष्ट्रवादीकडून उमेदवारी जाहीर झाली आहे. अरुण अण्णा लाड हे क्रांती साखर कारखान्याचे चेअरमन आहेत. तसंच स्वातंत्र्य सैनिक, क्रांतीअग्रनी स्वर्गीय जी. डी. बापू लाड यांचे पुत्र आहेत.
Read Also :
महाराष्ट्र विधान परिषद निवडणूक, कोण कोणत्या पक्षाचा उमेदवार?
भारत -चीन यांच्यातील सीमा तिढा सुटण्याची चिन्हे
केंद्रीय आरोग्यमंत्र्यांकडून महाराष्ट्र सरकारचे कौतुक
भाजप आमदारांनी साथ सोडू नये म्हणूनच फडणवीसांना ‘हे’ नेहमी सांगावं लागतं….
‘महाविकास आघाडीच्या आपसातील कुरबुरीच हे सरकार पडण्यास कारणीभूत ठरतील’
पुणे पदवीधर मतदारसंघातून राष्ट्रवादीकडून अरुण लाड यांना उमेदवारी