मुंबई : मुंबईतील भ्रष्टाचारसंबंधी ठाकरे गटाचा आदित्य ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली विराट मोर्चा मुंबई महानगरपालिकेवर धडकणार आहे. मोर्चोला पोलिसांनी अद्यापही परवानगी दिलेली नाही. परंतु ठाकरे गट विराट मोर्चावर ठाम राहिला असून मुसळधार पावसात मुसळधार मोर्चा निघणार असल्याचा इशारा दिला आहे. परंतु त्याआधी युवा सेनेचा कार्यकारीणी सदस्य शिंदे गटात प्रवेश करणार असल्याने राजकीय वर्तुळात एकच चर्चा रंगली आहे.
हेही वाचा…“माझ्या गुगलीवर फडणवीसांनी विकेट टाकली,” फडणवीसांच्या गौप्यस्फोटानंतर शरद पवारांचा टोला
१ जुलै रोजी ठाकरे गटाचा मुंबई महानगरपालिकेवर धडक मोर्चा निघणार आहे. त्याआधी युवासेनेचा कार्यकारीणी सदस्य असलेले राहुल कनाल शिंदे गटात प्रवेश करणार आहेत. राहुल कनाल हे आदित्य ठाकरे यांचे अत्यंत निकतवर्तीय मानले जातात. त्यामुळे मुंबईतील विराट मोर्चा निघण्याअगोदर ठाकरे गटाला मोठा धक्का बसला आहे.
हेही वाचा…“नाशिकमध्ये पहिला लढा ठाकरेंनी जिंकला, शिंदे गटाला कोर्टाचा मोठा दणका दिला”
दरम्यान, अलिकडेच ठाकरेंची साथ सोडणार असल्याचे राहुल कनाल यांनी संकेत दिले होते. तशापद्धतीने त्यांनी पोस्ट देखील केली होती. यातच आता मुंबईमध्ये मोर्चाेचे आयोजन करण्यात आले. त्या दिवशीचा मुहूर्त साधत राहुल कनाल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत शिवसेना शिंदे गटात प्रवेश करणार आहेत.
READ ALSO :
हेही वाचा…केंद्रात शिंदे गटाला २ मंत्रिपद, तर राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार जुलै महिन्यात? कुणाला संधी, कुणाची वर्णी ?
हेही वाचा…“शरद पवारांच्या गुगलीने मी नव्हे तर “अजित पवार” क्लीनबोल्ड”, मी गुगली टाकली तर..,” देवेंद्र फडणवीसांचं सुचक वक्तव्य
हेही वाचा…राज्यात “शरद पवार विरूद्ध देवेंद्र फडणवीस” सामना…! वाद-प्रतिवाद, आरोप-प्रत्यारोप, राजकारण तापलं
हेही वाचा…“शिंदे-फडणवीस सरकारमुळे महाराष्ट्राने गुंतवणुकीत पुन्हा नंबर १ पटकावला”
हेही वाचा…मुलीसाठी बाप सरसावरला..! “ती स्वत:च कर्तृत्वाने निवडून आलीय,” शरद पवारांचं मोदींना प्रत्यु्त्तर