मुंबई : मागील काही दिवसापासून राज्यात राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार आणि राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस असं राजकीय वाकृयुद्ध रंगलं आहे. पहाटेच्या शपथविधीवरून शरद पवार आणि देवेंद्र फडणवीस यांच्यात जोरदार खडाजंगी बघायला मिळत आहे. तर दुसरीकडे भाजप आणि काॅंग्रेसमध्ये ट्विटवर ट्विटवार देखील रंगलं आहे.
हेही वाचा…“सरकार पडेल, पण मिंधे सरकारच्या मंत्रिमंडळाचा विस्तार होणार नाही”, आदित्य ठाकरेंनी शिंदेंना पुन्हा डिवचलं
पदाची लालसा आणि सत्तेची लालसेबद्दल शरद पवारांनी आम्हाला सांगूच नये. शरद पवारांनी सत्तेसाठी आणि पदासाठी काय काय केले हे महाराष्ट्राने पाहिलं आहे. काल आमचे नेते देवेंद्र फडणवीस म्हणालेच होते की, शरद पवारांची मिस्ट्री समजण्यासाठी त्यांची हिस्ट्री समजायला हवी. १९७७ साली स्थापन केलेली सत्ता ही जशी तुमची मुसद्देगिरी होती तशी आम्हीही केली. पण तुमची ती मुसद्देगीरी आणि आमची ती बेईमानी कशी ? असा सवाल भाजपने शरद पवार यांना केला आहे. तसेच विदेशी मॅडम सोबत राजकारम नको म्हणून तुम्ही वेगळा पक्ष काढलात. मात्र आपली डाळ शिजत नाही हे लक्षात आल्यावर पुन्हा एकदा विदेशी मॅडमशी संधाण साधत सत्ता उपभोगली. आता मात्र स्वत:चा भूतकाळ विसलात. असंही भाजपने म्हणत राष्ट्रवादीला डिवचलं आहे.
हेही वाचा…“काही दिवस आम्ही, काही दिवस…,” पुढचा मुख्यमंत्री कोण असणार ? फडणवीसांच्या विधानानंतर शिंदे गटाची भूमिका
भाजपने केलेल्या टिकेवर राष्ट्रवादीने प्रत्युत्तर दिलं आहे. सत्तेसाठी तुम्ही कुठेही जाऊ शकता ही भाजपाची भूमिका समाजासमोर वारंवार आलेली आहे. भाजपा सत्तेसाठी किती लाचार आहे याची प्रचिती महाराष्ट्राप्रमाणेच गुजरात, गुवाहटी आणि गोवातील जनतेलाही मिळाली आहे आणि या राज्यांची सफर करून आलेले शिवसेनेचे आमदार याचे चालते बोलते पुरावे आहेत. तेव्हा आपल्या सत्तालोलुपतेची वाच्यता होऊ नये म्हणून पुन्हा पुन्हा जुना इतिहास उकरून काढायचा आणि लोकांच्या मनावर चुकीचा इतिहास ठसवत राहायचा ही भाजपाची जुनी मोडस ऑपरेंडी आहे. काँग्रेसवर टीका करणे हे एकच धोरण तुम्ही गेली ९ वर्षे देशात राबवत आहात. निवडणुका जसजशा जवळ येत आहेत तसे राज्यातलही हेच धोरण तुम्ही सुरू केले आहे, हे उघड आहे.. कधीतरी यातून बाहेर पडून विकासाच्या मुद्द्यांवर बोला.. असंही सांगण्यात आलं आहे.
सत्तेच्या लालसेतून रसिक बनलेले ज्येष्ठ नेते @PawarSpeaks यांनी किमान सत्तेच्या लालसेबद्दल तरी बोलू नये. @NCPspeaks pic.twitter.com/18tk1CIK60
— भाजपा महाराष्ट्र (@BJP4Maharashtra) June 29, 2023
READ ALSO :
हेही वाचा…“शिंदे-फडणवीस सरकारमुळे महाराष्ट्राने गुंतवणुकीत पुन्हा नंबर १ पटकावला”
हेही वाचा…मुलीसाठी बाप सरसावरला..! “ती स्वत:च कर्तृत्वाने निवडून आलीय,” शरद पवारांचं मोदींना प्रत्यु्त्तर
हेही वाचा…“माझ्या गुगलीवर फडणवीसांनी विकेट टाकली,” फडणवीसांच्या गौप्यस्फोटानंतर शरद पवारांचा टोला
हेही वाचा…“नाशिकमध्ये पहिला लढा ठाकरेंनी जिंकला, शिंदे गटाला कोर्टाचा मोठा दणका दिला”
हेही वाचा…कल्याण लोकसभा मतदारसंघाबाबत फडणवीसांचं सुचक विधान, भाजप-शिंदेंचे संबंध ताणले होते