मुंबई : पहाटेच्या शपथविधीबाबत राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अनेक गौप्यस्फोट केले आहेत. राष्ट्रवादी-भाजप युतीबाबत राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या उपस्थितीत बैठक पार पडली होती. पंरतु ऐनवेळी शरद पवार यांनी माघार घेतली. त्यामुळे अजित पवार यांच्याकडे कोणताच पर्याय शिल्लक राहिला नाही. असं देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले. तसेच त्यांनी आगामी विधानसभा निवडणुक ही एकनाथ शिंदेंच्याच नेतृत्वाखाली लढविणार असल्याचं म्हटलं आहे. त्यावर आता शिंदे गटाने आपली भूमिका स्पष्ट केली आहे.
हेही वाचा…होय, माझी शरद पवारांसोबत बैठक झाली होती..! अखेर फडणवीसांनी फोडला राजकीय बॉम्ब
देवेंद्र फडणवीस यांनी काल एका राष्ट्रीय वृत्तवाहिनीला मुलाखत दिली. त्या मुलाखतीत देवेंद्र फडणवीस यांनी राजकारणाबाबत अनेक गौप्यस्फोट केलेत. यातच त्यांनी पुढचा मुख्यमंत्री कोण असणार त्यावरही भाष्य केले आहे. ते म्हणाले की, कोणत्याही पक्षाला आणि कार्यकर्त्याला हेच वाटत असतं की आमचा नेता मुख्यमंत्री व्हावा. पण २०१४ ची निवडणुक एकनाथ शिंदे मुख्यमंत्री असतानाच आम्ही लढवू. जो मुख्यमंत्री असतो, तोच सरकारचा नेता असतो. त्याच्याच नेतृत्वात निवडणुका लढवल्या जातात.
हेही वाचा…“भिडेंना काय कर्णाने दान केलेलं कर्ण कवच सापडलं आहे का ?” जितेंद्र आव्हाडांचा संतप्त सवाल
शिंदे गटातील मंत्री दिपक केसरकर यांनी यावर भाष्य केले आहे. मुख्यमंत्री कोण असेल हे दोघांनी मिळून ठरवायचं आहे. याआधी देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केलं आहे की आम्ही युती म्हणून एकनाथ शिंदेंच्याच नेतृत्वाखाली निवडणुकीला सामोरे जाऊ. निवडणुक झाल्यानंतर काही बदल होणार असतील, तर ते दोघांनी आणि वरिष्ठ नेत्यांनी बसून ठरवलं पाहिजे. पण आज तरी जे दोन्ही पक्षांमध्ये ठरलंय आणि देवेंद्र फडणवीस यांनी स्वत: जाहीर केलं आहे. त्यानुसार एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली लढवणार आहे. काही दिवस तुम्ही, काही दिवस आम्ही राहू. वगैरे त्याबद्दल आमची भूमिका लवचिक आहे. असंही दिपक केसरकर यांनी म्हटलं आहे.
READ ALSO :
हेही वाचा…“अधिक आक्रमक व्हा, कामगिरी सुधारा,” फडणवीसांनी बैठकीत भाजप मंत्र्यांना झापलं
हेही वाचा…२०२४ चा मुख्यमंत्री कोण? “शिंदेंच्या नेतृत्वात निवडणुका लढवू पण.”. देवेंद्र फडणवीसाचं मोठं विधान
हेही वाचा…“जयंत पाटलाचं प्रदेशाध्यक्ष पद जाणार, अजित पवारांच्या नावाची बैठकीत चर्चा”
हेही वाचा…“भाजपसाठी राष्ट्रवादी हा बी प्लॅन, भाजप-राष्ट्रवादी युती फिक्स होती,” फडणवीसांचा मोठा गौप्यस्फोट
हेही वाचा…पिंपरी चिंचवडमध्ये राष्ट्रवादीला मोठा हादरा, राष्ट्रवादीचा एकमेव आमदार एकनाथ शिंदेंच्या वाटेवर