मुंबई : आगामी लोकसभा, विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राज्यातील राजकीय पक्षांनी जोरदार तयारी सुरू केली आहे. यातच आता राजकीय आढावा बैठका प्रमुख नेत्यांच्या नेतृत्वाखाली होत आहेत. यातच आता राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत भाजप कोअर कमिटीची महत्वाची बैठक बुधवारी रात्री पार पडली. या बैठकीत देवेंद्र फडणवीस यांनी कार्यकर्त्यांना झाप झापलं आहे.
हेही वाचा…“भिडेंना काय कर्णाने दान केलेलं कर्ण कवच सापडलं आहे का ?” जितेंद्र आव्हाडांचा संतप्त सवाल
मुंबई येथे पार पडलेल्या बैठकीत कामगिरी सुमार असलेल्या मंत्र्यांना कामगिरी सुधारण्याचे आदेश देवेंद्र फडणवीस यांनी या बैठकीत दिल्याचं कळतंय. आपल्याला मिशन ४५ हे लक्ष पूर्ण करायचं आहे, त्यासाठी कामगिरी अधिक सुधारा, असंही देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे. राज्यात महाविकास आघाडीला टक्कर द्यायची असेल तर अधिक आक्रमक व्हा. अशी आक्रमक पवित्रा देखील फडणवीसांनी घेतला आहे.
हेही वाचा…“अशी पुन्हा कावकाव केली तर..” राष्ट्रवादीकडून भगिरश भालकेंचा जोरदार समाचार
आपल्याला मिशन ४५ हे पुर्ण करायचं आहे. त्यासाठी तुम्ही घेतलेले निर्णय जनतेपर्यंत पोहोचवा. निर्णय घेताना काही अडचणी येत असतील तर मला सांगा. आपल्या पक्षाचे पदाधिकारी, कार्यकर्ते यांची कामे प्राधान्याने करा. जनतेत केंद्र आणि राज्य सरकारची प्रतिमा उंचवा. असा सल्ला देखील उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भाजपच्या मंत्र्यांना दिला असल्याची माहिती मिळत आहे.
READ ALSO :
हेही वाचा…२०२४ चा मुख्यमंत्री कोण? “शिंदेंच्या नेतृत्वात निवडणुका लढवू पण.”. देवेंद्र फडणवीसाचं मोठं विधान
हेही वाचा…“जयंत पाटलाचं प्रदेशाध्यक्ष पद जाणार, अजित पवारांच्या नावाची बैठकीत चर्चा”
हेही वाचा…“भाजपसाठी राष्ट्रवादी हा बी प्लॅन, भाजप-राष्ट्रवादी युती फिक्स होती,” फडणवीसांचा मोठा गौप्यस्फोट
हेही वाचा…पिंपरी चिंचवडमध्ये राष्ट्रवादीला मोठा हादरा, राष्ट्रवादीचा एकमेव आमदार एकनाथ शिंदेंच्या वाटेवर
हेही वाचा…होय, माझी शरद पवारांसोबत बैठक झाली होती..! अखेर फडणवीसांनी फोडला राजकीय बॉम्ब