पुणे : राष्ट्रवादीचे पिंपरी-चिंचवड शहरातील राष्ट्रवादीचे एकमेव आमदार अण्णा बनसोडे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या थेट संपर्कात असल्याची जोरदार चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे. मागील काही महिन्यापासून अण्णा बनसोडे राष्ट्रवादीच्या कार्यक्रमाला गैरहजर असल्याने ते शिवसेनेत प्रवेश करणार असल्याचं संकेत मिळत आहेत. अण्णा बनसोडे यांनी राष्ट्रवादीला राम राम ठोकला तर पिंपरी चिंचवड शहरात राष्ट्रवादीला मोठा धक्का बसण्याची शक्यता आहे.
हेही वाचा…“संभाजी भिडेंना देशद्रोहाच्या आरोपाखाली अटक करा,” छगन भुजबळांची मागणी
२०१४ च्या विधानसभेपासून राष्ट्रवादीचा बालेकिल्ला असलेल्या पिंपरीतील गटबाजीने राष्ट्रवादीला हादरे गेलेत. परंतु २०१९ मध्ये राज्यात महाविकास आघाडी सरकार स्थापन झाल्यानंतर भाजपचे अनेक नगरसेवक राष्ट्रवादीकडे झुकले. मात्र, एकनाथ शिंदे यांनी भाजपसोबत सत्ता स्थापन केल्यानंतर नगरसेवकांचं आऊटगोईंग थांबलं. आता आमदार बनसोडे पक्षापासून दूर जात असल्याचे दिसून येत आहे.
हेही वाचा…बोले तैसा चाले..! “मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री जोडगोळीची कमाल…!”, भाजप नेत्यानी केलं कौतुक
दरम्यान, काही दिवसापासून अण्णा बनसोडे राष्ट्रवादीच्या कार्यक्रमांना गैरहजेरी लावत आहेत. पण गेल्या आठवड्यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे पिंपरीत बनसोडेंच्या कार्यालयावर गेले होते. तेव्हापासून ते शिवसेनेकडे जाणार असल्याची चर्चा वाढली आहे. मात्र. मी राष्ट्रवादीकडूनच लढणार असल्याचा दावा बनसोडे यांनी केला आहे.
READ ALSO :
हेही वाचा…होय, माझी शरद पवारांसोबत बैठक झाली होती..! अखेर फडणवीसांनी फोडला राजकीय बॉम्ब
हेही वाचा…“भिडेंना काय कर्णाने दान केलेलं कर्ण कवच सापडलं आहे का ?” जितेंद्र आव्हाडांचा संतप्त सवाल
हेही वाचा…“अशी पुन्हा कावकाव केली तर..” राष्ट्रवादीकडून भगिरश भालकेंचा जोरदार समाचार
हेही वाचा…भीम आर्मीचे प्रमुखांवर जीवघेणा हल्ला, अज्ञात व्यक्तींकडून चंद्रशेखर आझाद यांच्यावर गोळीवर
हेही वाचा…“४० हजार कोटी रूपयांची गुंतवणुक, १ लाख २० हजार रोजगार निर्मिती,” शिंदेंनी एका झटक्यात विरोधकांची हवा टाईट केली