नवी दिल्ली : 2019 मध्ये महाराष्ट्र विधानसभा निवडणुकानंतर घडलेल्या पहाटेच्या शपथविधीच्या राजकीय नाट्यबाबत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मोठा गौप्यस्फोट केला आहे. राष्ट्रवादी आणि भाजपचे सरकार स्थापन करण्यासाठी स्वतः राष्ट्रवादी काँग्रेस अध्यक्ष शरद पवार यांनी परवानगी दिली तसेच त्यांच्यासोबत माझी बैठक देखील पार पडली होती, असा खुलासा फडणवीस यांनी केला आहे. रिपब्लिक टीव्हीला दिलेल्या मुलाखतीमध्ये त्यांनी पहाटेच्या शपथविधीचा संपूर्ण घटनाक्रम उलगडून सांगितलं आहे.
हेही वाचा…बोले तैसा चाले..! “मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री जोडगोळीची कमाल…!”, भाजप नेत्यानी केलं कौतुक
” २०१९ साली विधानसभा निवडणुकीचा निकाल लागल्यानंतर उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्रीपदासाठी काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस सोबत बोलणी सुरू केली होती. त्यावेळी आम्ही संपर्क केल्यानंतर ते आमचे फोन देखील घेत नसल्याने हे काही आता आपल्यासोबत येणार नाहीत हे समजून घेतलं. त्यामुळे आमच्याकडे असणाऱ्या पर्यायांची चाचपणी सुरू केली, त्याचवेळी राष्ट्रवादीतील काही नेत्यांनी आमच्याशी संपर्क करत महाराष्ट्रात स्थिर सरकार देण्यासाठी भाजपसोबत सरकार स्थापन करण्याची तयारी दाखवली होती”, असा खुलासा देवेंद्र फडणवीस यांनी केला आहे.
हेही वाचा…“मुख्यमंत्री पदाच्या शर्यतीत असल्यामुळे अनेक घोटाळ्यात अडकवण्याचा प्रयत्न झाला”, खडसेंचा फडणवीसांवर आरोप
राष्ट्रवादीतील नेत्यांशी बोलणे झाल्यानंतर स्वतः शरद पवार यांच्यासोबत आमची बैठक झाली, यामध्ये सरकार स्थापन करण्यावर एकमत झाले. पदांचे वाटप आणि पुढील रणनीती देखील ठरली, अजित पवार आणि माझ्याकडे सर्व अधिकार देण्यावर बैठकीत ठरलं होत. मात्र आमच्या शपथविधीच्या दोन-तीन दिवसांपूर्वी अचानक शरद पवार या सर्वांमधून बाहेर पडले. परंतु अजित पवारांकडे काही मार्ग उरला नसल्याने त्यांनी माझ्यासोबत शपथ घेतली, त्यावेळी देखील त्यांना या सर्व घडामोडींमध्ये शरद पवार साथ देतील, असा विश्वास होता. परंतु तसं न झाल्याने राजीनामा द्यावा लागला, असा गौप्यस्फोट देवेंद्र फडणवीस यांनी केला आहे.
READ ALSO :
हेही वाचा…“भिडेंना काय कर्णाने दान केलेलं कर्ण कवच सापडलं आहे का ?” जितेंद्र आव्हाडांचा संतप्त सवाल
हेही वाचा…“अशी पुन्हा कावकाव केली तर..” राष्ट्रवादीकडून भगिरश भालकेंचा जोरदार समाचार
हेही वाचा…भीम आर्मीचे प्रमुखांवर जीवघेणा हल्ला, अज्ञात व्यक्तींकडून चंद्रशेखर आझाद यांच्यावर गोळीवर
हेही वाचा…“४० हजार कोटी रूपयांची गुंतवणुक, १ लाख २० हजार रोजगार निर्मिती,” शिंदेंनी एका झटक्यात विरोधकांची हवा टाईट केली
हेही वाचा…“संभाजी भिडेंना देशद्रोहाच्या आरोपाखाली अटक करा,” छगन भुजबळांची मागणी