जळगाव : देवेंद्र फडणवीस सध्या ताणतणावात गेले आहेत. अलीकडच्या कालखंडात पाहिलं तर देवेंद्र फडणवीस यांनी केलेली टीका थोडी विचित्र वाटते. जमिनीचा व्यवहार नियमानुसार आहे. त्याच्याशी माझा काहीही संबंध नाही. मुख्यमंत्री पदाच्या शर्यतीत असल्यामुळे मला अनेक घोटाळ्यात अडकवण्याचा प्रयत्न करण्यात आला आला. मला बदनाम करण्याचा प्रयत्न केला, असा आरोप राष्ट्रवादीचे आमदार एकनाथ खडसे यांनी देवेंद्र फडणीस यांच्यावर केला. एकनाथ खडसे यांनी भोसरीच्या जमिनीत काळ तोंड केलं नसतं तर ते आमच्या पक्षात राहिला असते. असा घणाघात काल देवेंद्र फडणीस यांनी केला होता. त्यावर आता एकनाथ खडसे यांनी आपली प्रतिक्रिया दिली.
हेही वाचा…BRS पक्षात प्रवेश करतात भगीरथ भालकेंचा पवारांना कडक शब्दात इशारा ! म्हणाले की, “उद्यापासून भालके काय चीज..”
भोसरी जमिनी प्रकरणाशी माझा कोणताही संबंध नाही. जमीनच खरेदी केली नाही तर व्यवहार कसा केला. ? तोंड काळं करण्यासारखं काही केलचं नाही. परंतु तोंड काळकुट्ट करण्यासारखं चेहरे तुमच्या शेजारी बसतात. असा टोला देखील एकनाथ खडसे यांनी देवेंद्र फडणवीस यांच्या वर लगावला. राजकीय जीवनात त्यांनी अनेक भ्रष्टाचाराचे गुन्हे केले आहेत. ते आज तुमच्या मंत्रिमंडळात आहेत. त्यांच्या बद्दल तुम्हाला बोलायला काय जातं. असंही ते म्हणाले.
हेही वाचा…भाजपच्या हातून आणखी एक राज्य निसटणार, २०२४ च्या विधानसभा निवडणुकीत मोठा धक्का बसणार, सर्व्हे आला समोर
दरम्यान, जळगावात “शासन आपल्या दारी” या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आले होते. यावेळी एकनाथ खडसे यांच्या सह राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या गाडीला काळे झेंडे दाखवले. त्यानंतर ज्यांनी भोसरीच्या जमिनीत काळ तोंड केले आहेत ते आता आम्हाला काळे झेंडे दाखवताहेत. अशी टीका फडणवीस यांनी खडसेंवर केली.
READ ALSO :
हेही वाचा…“राज्यातील साडेबारा कोटी जनतेला ५ लाखांचा आरोग्य विमा”, एकनाथ शिंदेंचा मोठा निर्णय
हेही वाचा…“गुणरत्ने सदावर्ते मनोरूग्ण, गृहमंत्र्यांनी तात्काळ त्यांच्यावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करावा”
हेही वाचा…पंकजा मुंडेंनतर आता राजू शेट्टी BRS च्या टार्गेटवर, थेट मुख्यमंत्री पदाची दिली ऑफर
हेही वाचा…शिंदेंची निवडणुकीपुर्वी मोठी खेळी, राज्यात ‘७००’ ठिकाणी बाळासाहेब ठाकरे “आपला दवाखाना” उभारणार
हेही वाचा…टेक्नोसॅव्ही पुणे ‘भाजप’ला कळेना फेक मॅसेज, फेसबुकवरील त्या पोस्टमुळे तोंडावर पडण्याची वेळ?