मुंबई : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत पार पडलेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत आज विविध निर्णय घेण्यात आले. सह्याद्री राज्य अतिथीगृह येथे आयोजित बैठकीत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी हिंदुह्यदयसम्राट बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना, वर्सोवा-वांद्रे सागरी सेतूला स्वातंत्र्यवीर सावरकर नाव, तसेच मुंबई ट्रान्स हार्बर लिंक मार्गाला अटलबिहारी वायपेयी शिवडी न्हावा शेवा अटल सेतू असे नाव देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
हेही वाचा…मुसळधार पावसात ”मुसळधार मोर्चा” होणार, ठाकरे गटाचा ‘राज्य सरकार’ विरूद्ध एल्गार
महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजना व आयुष्यमान भारत प्रधानमंत्री आरोग्य योजना एकत्रित राबविणार आहेत. या योजनेत २ कोटी कार्ड वाटणार असून आता पर्यंत ५ लाखांपर्यत आरोग्य संरक्षण देण्यात आलं आहे. तर राज्यात ७०० ठिकाणी हिंदुह्रदयसम्राट बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना उभारण्यात येणार असून यासाठी २१० कोटी रूपयांना मान्यता देण्यात आली आहे.
हेही वाचा…मुख्यमंत्र्यांसह शिंदेंची अर्धा डझन मंत्र्यांची फौज पंढरपुरात जाणार, विठुरायच्या दर्शनानंतर मंत्रिमंडळाचा विस्तार ?
याचसोबत संजय गांधी, श्रावणबाळ योजनेतील निवृत्तीवेतनात भरीव वाढ करण्यात आले आहे. तर आता असंघटित कामगारांच्या कल्याणासाठई महामंडळाच्या माध्यमातून करोडो कामगारांना लाभ मिळणार आहे. याचसोबत नानाजी देशमुख कृषि संजीवनी प्रकल्पाच्या दुसरा टप्पा होणार असून यामध्ये विदर्भातील जिल्ह्याचा आता समावेश करण्यात आला आहे.
हेही वाचा…“अजित पवारांची प्रदेशाध्यक्षपदाची इच्छा पुर्ण होणार, सुप्रिया सुळे, प्रफुल्ल पटेल आज निर्णय घेणार”
दरम्यान, मराठवाडा मुक्तीसंग्रामाचे भव्य स्मारक छत्रपती संभाजीनगर येथे उभारण्यात येणार असून यासाठी १०० कोटींच्या खर्चास मान्यता देण्यात आली आहे. राज्यात ९ ठिकाणी नवीन शासकीय महाविद्यालये. ४३६५ कोटी खर्चास मान्यता देण्यात आली आहे. तर जालना ते जळगाव नवीन ब्रॉडगेज रेल्वे मार्गासाठी ३५५२ कोटी खर्चास मान्यता दिली आहे. तर दारिद्र्यरेषेवरील पालकांच्या मुलांना देखील मोफत गणवेश देणार आहे. यामध्ये १२ लाख विद्यार्थ्यांना मिळणार लाभ आहे.
मुख्यमंत्री @mieknathshinde यांच्या अध्यक्षतेखाली पार पडलेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत विविध निर्णय घेण्यात आले. सह्याद्री राज्य अतिथीगृह येथे आयोजित बैठकीस उपमुख्यमंत्री @Dev_Fadnavis यांचेसह मंत्रिमंडळ सदस्य उपस्थित होते.
👉 संक्षिप्त #मंत्रिमंडळनिर्णय :
— CMO Maharashtra (@CMOMaharashtra) June 28, 2023
READ ALSO :
हेही वाचा…टेक्नोसॅव्ही पुणे ‘भाजप’ला कळेना फेक मॅसेज, फेसबुकवरील त्या पोस्टमुळे तोंडावर पडण्याची वेळ?
हेही वाचा…BRS पक्षात प्रवेश करतात भगीरथ भालकेंचा पवारांना कडक शब्दात इशारा ! म्हणाले की, “उद्यापासून भालके काय चीज..”
हेही वाचा…भाजपच्या हातून आणखी एक राज्य निसटणार, २०२४ च्या विधानसभा निवडणुकीत मोठा धक्का बसणार, सर्व्हे आला समोर
हेही वाचा…सदाशिव पेठेत तरुणीवर हल्याचा थरार, आरोपीवर कठोर कारवाई करण्याची बापटांची मागणी
हेही वाचा…नाशिकमध्ये भाजपला मोठा धक्का, भाजप आमदाराच्या बंधूचा पटोलेंच्या उपस्थित काॅंग्रेसमध्ये प्रवेश