पुणे : पुणे शहरातील मध्यवर्ती भाग असणाऱ्या सदाशिव पेठेत महाविद्यालयीन तरुणीवर भरदिवसा हल्ला करण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार काल घडला. हल्ला करणारा आरोपी शंतनु जाधव हा तरुणीवर एकतर्फी प्रेम करत होता. त्याने सदाशिव पेठेत तरुणीला गाठत बोलण्याचा प्रयत्न केला, परंतु तरुणीने त्याला झिडकारल्याने आरोपीने तिच्यावर कोयत्याने वार केले. यावेळी एमपीएससीची तयारी करणारा तरुण लेशपाल जवळगेने तरुणाला रोखल्याने पुढील अनर्थ टळला. दरम्यान, पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे.
हेही वाचा…“ज्यांनी १५ वर्षे मुंबई महापालिका ओरबडली, तेच आता….”, मुख्यमंत्र्यांचा उद्धव ठाकरेंवर हल्लाबोल
वर्दळीचा भाग असणाऱ्या सदाशिव पेठेत ही धक्कादायक घटना घडल्याने खळबळ उडाली आहे. भाजपच्या नेत्या स्वरदा बापट यांनी पोलीस उपायुक्त संदीपसिंह गिल यांची भेट घेत आरोपीवर कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे. शहरातील पेठ परिसरात स्पर्धा परीक्षेची तयारी करण्याऱ्या हजारो विद्यार्थांनी तसेच स्थानिक भागातील महिलांच्या सुरक्षेसाठी ठोस पाऊले उचलावीत. दामिनी पथक आणि पोलीस मदत हेल्पलाईन संदर्भात जनजागृती करावी, अशी मागणी यावेळी बापट यांच्याकडून करण्यात आली.
हेही वाचा…“‘भिडे चे नवे किडे’ या वृत्तीला वेळीच ठेचलं पाहिजे”, वर्षा गायकवाडांचा संभाजी भिडेंवर हल्लाबोल
दरम्यान, ही थरारक घटना घडत असताना बघ्यांची गर्दी होती, मात्र लेशपाल जवळगे आणि आणखीन काही तरुणांनी दाखवलेल्या धाडसामुळे तरुणीचा जीव वाचवला याबद्दल स्वरदा बापट यांनी कौतुक केलं आहे.
READ ALSO :
हेही वाचा…नाशिकमध्ये भाजपला मोठा धक्का, भाजप आमदाराच्या बंधूचा पटोलेंच्या उपस्थित काॅंग्रेसमध्ये प्रवेश
हेही वाचा…मुसळधार पावसात ”मुसळधार मोर्चा” होणार, ठाकरे गटाचा ‘राज्य सरकार’ विरूद्ध एल्गार
हेही वाचा…मुख्यमंत्र्यांसह शिंदेंची अर्धा डझन मंत्र्यांची फौज पंढरपुरात जाणार, विठुरायच्या दर्शनानंतर मंत्रिमंडळाचा विस्तार ?
हेही वाचा…“अजित पवारांची प्रदेशाध्यक्षपदाची इच्छा पुर्ण होणार, सुप्रिया सुळे, प्रफुल्ल पटेल आज निर्णय घेणार”
हेही वाचा…राष्ट्रवादी काॅंग्रेस नेत्यांचे डिस्ने कार्टून स्टाईलमध्ये फोटो व्हायरल, अजित दादांचा तर भन्नाट, पाहा फोटो