मुंबई : मुंबई महानगरपालिकेतील भ्रष्टाचार बाहेर काढण्यासाठी ठाकरे गटाकडून १ जुलै रोजी मोर्चा काढण्यात येणार आहे. त्याआधी या आंदोलनाला सुरूवातीला पोलिसांनी परवानगी नाकारली होती. परंतु ठाकरे गटातील शिष्टामंडळ पोलिसांच्या भेटीला गेल्यानंतर मोर्चा मार्ग बदलवून परवानगी दिली आहे. यावरून आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ठाकरेंवर निशाणा साधला आहे.
हेही वाचा…एकनाथ शिंदेंचा एक आदेश अन् राष्ट्रवादी काॅंग्रेसचे ‘१८’ नगरसेवक ‘सहा’ वर्षासाठी निलंबित
महाराष्ट्रात बाळासाहेबांच्या विचारांचं हिदूत्ववादी सरकार स्थापन झालं आहे. आत्तापर्यंत थांबलेली आणि थांबवलेली विकासकामं मोठ्या प्रमाणात पुढे जात आहेत. मुंबई ज्यांनी १५ वर्षे ओरबाडली, मुंबईची लूट केली ते आता हिशोब द्यायची वेळ आल्यावर मोर्चे काढत आहेत. असा हल्लाबोल एकनाथ शिंदे यांनी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर केला.
हेही वाचा…“टिकाटिपण्या, फोडाफोडीचं राजकारण, दडपशाही यातून जर सवड मिळाली तर..” काॅंग्रेसचा फडणवीसांवर निशाणा
दरम्यान, पोलिसांनी मोर्चाला परवानगी नाकारल्याने ठाकरे गटातील नेत्यांचं शिष्ठामंडळ पोलिस आयुक्तांच्या भेटीला गेले. यानंतर १ जुलै रोजी निघणाऱ्या मोर्चाचा मार्ग पोलिसांनी बदलला असल्याची माहिती समोर आली आहे. यातच आता हा मोर्चा मेट्रो सिनेमा ते पालिका गेट क्रमांक दोन असा असणार आहे.
READ ALSO :
हेही वाचा…“‘भिडे चे नवे किडे’ या वृत्तीला वेळीच ठेचलं पाहिजे”, वर्षा गायकवाडांचा संभाजी भिडेंवर हल्लाबोल
हेही वाचा…“..तर देवेंद्र फडणवीसांनी आपल्या गृहमंत्री पदाचा राजीनामा द्यावा”
हेही वाचा…“कालच्या प्रकरणावरून शिंदे-फडणवीसांच्या भक्तगणांनी बांगड्या फोडायला सुरूवात केली”, सुषमा अंधारेंचा हल्लाबोल
हेही वाचा…उद्धव ठाकरे आणि संजय राऊतांना समन्स…! ‘या’ प्रकरणात १४ जुलैला कोर्टात हजर राहण्याचे आदेश
हेही वाचा…पुण्यात दिवसा ढवळ्या तरूणीवर कोयत्याने हल्ला..! “गृहमंत्र्यांनाही बहुथा राजकीय..,” अजित पवारांचा घटनेवर संताप