पुणे : पुण्याच्या वर्दळीचा ठिकाण असलेल्या सदाशिव पेठेत पेरूगेट पोलीस चौकीजवळ एका तरूणीवर कोयत्याने हल्ला झाल्याची घटना घडली आहे. पावन मारूती मंदिराजवळ तरूणी थांबली असता त्याठिकाणी हल्लेखोर तरूण आला. अन् त्याच्यात वाद घालण्यात सुरूवात केली. त्यानंतर तरूणीवर हल्लेखोरांनी कोयत्याने हल्ला करण्यास सुरूवात केली. परंतु त्याठिकाणाहून तरूणीनी पळ काढल्याने तिचा जीव वाचला. यावरून आता राज्यातील विरोधी पक्षातील नेत्यांनी उपमुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर निशाणा साधाला आहे.
हेही वाचा…“अनिल परबांवर कडक कारवाई झाली पाहिजे”, भाजप नेत्याची मागणी
विद्येचे माहेरघर असलेल्या पुणे शहारात गुन्हेगारी प्रचंड प्रमाणात फोफावल्याचं चित्र आहे. गुन्हेगारांवर कायद्याचा अजिबात वचक राहिला नसल्याचं दिसतंय. दिवसाढवळ्या विद्यार्थींनीवर कोयत्यानं हल्ले होत आहेत. गृहमंत्र्यांनाही बहुथा राजकीय कलगीतुऱ्यातून कायदा व सुव्यवस्था हाताळण्यास वेळ मिळत नसावा. सुसंस्कृत म्हणून पुर्वापार ख्याती असलेलं पुणे इतकं हिंस्त्र झालेलं यापूर्वी कधीच पाहिलंन नाही. या घटनेचा मी तीव्र शब्दांत निषेध व्यक्त करतो. असं राज्याचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी म्हटलं आहे.
हेही वाचा…“..अशीच नौटंकी सुरू असेल तर चंद्रशेखर रावांचा तेलंगणातही पराभव होईल”,
दरम्यान, काॅंग्रेसने या घटनेचा व्हिडीओ ट्विट करत फडणवीसांवर निशाणा साधला आहे. पुण्यातील भरदिवसा हा घडलेला प्रकार आहे. कायद्याची लख्तर वेशीवर टांगली जात असतांना गृहमंत्री काय करतायत? टिकाटिपण्या, फोडाफोडीचं राजकारण, दडपशाही यातून जर सवड मिळाली तर जरा कायदा सुव्यवस्थेकडेही लक्ष्य द्या फडणवीस महोदय असं काॅंग्रेसने म्हटलं आहे.
विद्येचे माहेरघर असलेल्या पुणे शहरात गुन्हेगारी प्रचंड प्रमाणात फोफावल्याचं चित्र आहे. गुन्हेगारांवर कायद्याचा अजिबात वचक राहिला नसल्याचं दिसतंय. दिवसाढवळ्या विद्यार्थिनींवर कोयत्यानं हल्ले होत आहेत. गृहमंत्र्यांनाही बहुधा राजकीय कलगीतुऱ्यातून कायदा व सुव्यव्यस्था हाताळण्यास वेळ…
— Ajit Pawar (@AjitPawarSpeaks) June 27, 2023
READ ALSO :
हेही वाचा…एकनाथ शिंदेंचा एक आदेश अन् राष्ट्रवादी काॅंग्रेसचे ‘१८’ नगरसेवक ‘सहा’ वर्षासाठी निलंबित
हेही वाचा…“टिकाटिपण्या, फोडाफोडीचं राजकारण, दडपशाही यातून जर सवड मिळाली तर..” काॅंग्रेसचा फडणवीसांवर निशाणा
हेही वाचा…खडसे अन् गुलाबराव पाटलांमध्ये समझोता, तडजोड..! ‘त्या’ प्रकरणाला लागला पुर्णविराम
हेही वाचा…“‘बाळासाहेबांना म्हातारा’, असं संबोधन करणाऱ्या सुषमा अंधारे तुमच्या नेते कश्या?”, मनसेचा सवाल
हेही वाचा…“पुण्यात तरूणीवर कोयत्याने वार,” अकार्यक्षम गृहमंत्री देवेंद्र फडणवीस राजीनामा द्या, राष्ट्रवादी आक्रमक