“बाळासाहेबांच्या फोटोवर हातोडा मारला, त्याच्या कानशिलात लगावली, एकदम मान्य. पण बाळासाहेबांना म्हातारा, असं संबोधन करणाऱ्या सुषमा अंधारे तुमच्या नेते कश्या? ” असा सवाल संदीप देशपांडे यांनी केला आहे.
हेही वाचा…सोलापुरात राष्ट्रवादीला मोठा धक्का बसणार, शरद पवारांच्या पट्टशिष्याचा मुलगा BRS मध्ये
वांद्रे येथील ४० वर्षाची जुनी शाखेवर मुंबई महानगरपालिकेने कारवाई केल्याने ठाकरे गटातील नेत्यांनी मोर्चा काढला होता. यावेळी वॉर्ड ऑफिसच्या कार्यालयामध्ये पालिका अधिकाऱ्याला शिवसैनिकांनी मारहाण केली होती. शाखा तोडल्याचा निषेध म्हणून ठाकरे गटातील एका अधिकाऱ्याला अनिल परब यांच्यासमोरच मारहाण केली होती. या प्रकरणानंतर ११ कार्यकर्त्यांना पोलिसांनी अटक केली असून अनिल परबांवर गुन्हा दाखल केला आहे.
हेही वाचा…“मनात राग आहे, की मुंबईचा पैसा हा दिल्लीश्वराच्या सांगण्यावरून लुटला जातोय”, आदित्य ठाकरे
वांद्रे पुर्व येथील शाखेत छत्रपती शिवाजी महाराजांची मुर्ती आणि बाळासाहेब ठाकरे यांची प्रतिमा होती. कारवाई करतांना महाराजांची मुर्ती आणि बाळासाहेबांची प्रतिमा बाहेर नेण्याची मागणी कार्यकर्त्यांनी अधिकाऱ्यांना केली, मात्र कार्यकर्त्यांच्या मागणीकडे दुलर्क्ष करत अधिकाऱ्यांना शाखेवर कारवाई केली. त्यानंतर ठाकरे गटाच्या शिवसैनिकांनी अधिकाऱ्यांना मारहाण केली.
बाळासाहेबांच्या फोटोवर हातोडा मारला त्याच्या कानशिलात लगावली एकदम मान्य पण बाळासाहेबांना “म्हातारा “असं संबोधन करणाऱ्या सुषमा अंधारे तुमच्या नेते कश्या ????
— Sandeep Deshpande (@SandeepDadarMNS) June 27, 2023
READ ALSO :
हेही वाचा…“पुण्यात तरूणीवर कोयत्याने वार,” अकार्यक्षम गृहमंत्री देवेंद्र फडणवीस राजीनामा द्या, राष्ट्रवादी आक्रमक
हेही वाचा…“अनिल परबांवर कडक कारवाई झाली पाहिजे”, भाजप नेत्याची मागणी
हेही वाचा…“..अशीच नौटंकी सुरू असेल तर चंद्रशेखर रावांचा तेलंगणातही पराभव होईल”,
हेही वाचा…मोठी बातमी..! ठाकरे गटातील ११ कार्यकर्त्यांना पोलिसांनी घेतलं ताब्यात, अनिल परबांवर गुन्हा दाखल
हेही वाचा…ठाकरे गटातील ‘बडा’ नेता आज एकनाथ शिंदे गटात जाणार, ठाकरेंचा आणखी एक मोहरा कमी होणार ?