मुंबई : एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेविरोधात बंडखोरी करत भाजपसोबत युती करून त्यांनी मुख्यमंत्री पदाची शपथ घेतली. त्यानंतर ठाकरे गटातील अनेक कार्यकर्ते, पदाधिकारी आणि आमदार, खासदारांनी ठाकरेंची साथ सोडली. यातच एकनाथ शिंदे यांच्या गटात इनकमिंग सुरू असतांनाच ठाकरेंना अजून एक मोठा झटका बसण्याची शक्यता आहे.
हेही वाचा…“राज्यातील विरोधकांची महाविकास आघाडी म्हणजे कावळा, घुबड व सरड्याची अभद्र युती”
ठाकरे गटातील आणि विधान परिषदेच्या आमदार मनिषा कायंदे यांनी अलिकडेच एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश केला. त्यांच्यासोबत काही नगरसेवकांनी देखील ठाकरेंची साथ सोडत शिंदे गटात प्रवेश केला. यातच आता उद्धव बाळासाहेब ठाकरे गटातील आणखी एक मोहरा कमी होईल, असं सुचक विधान शिंदे गटातील प्रवक्ते नरेश म्हस्के यांनी केलं आहे.
हेही वाचा…“देशात स्वातंत्र्यानंतरच्या सर्वात शक्तीशाली प्रधानमंत्री म्हणजे इंदिरा गांधी “, शरद पवार
नरेश म्हस्के यांनी काही ओळींचे यमक जुळवत सुचक विधान केलं आहे. त्यात त्यांनी असं म्हटलं आहे की, आज उबाठा’चा आणखी एक मोहरा कमी होईल, खऱ्या शिवसेनेत येऊन विचारांशी निष्ठा ठेवील, नाहीच राहू शकत तिथे खरे कार्यकर्ते, आता स्मशान शांतात पसरणार तिकडे, मारोत कुणी काही बाता, सुपडा साफ होणार आणि तुमचे उखळ पांढरे होणार, उठा तुमच्यावर लवकरच झोपायची वेळ येणार, इडी चा फेरा ठेपलाच आहे येऊन तुमच्या दारी, म्यान करून ठेवा तुमच्या गंजल्या तलवारी असं म्हणत नरेश म्हस्के यांनी सुचक विधान केलं आहे.
दरम्यान, ठाकरे गटातील आता कोणता नेत्या एकनाथ शिंदे यांच्या गटात प्रवेश करणार? याची उत्सुकता आता सगळ्यांना लागून राहिलं आहे.
आज ‘उबाठा’चा आणखी
एक मोहरा कमी होईल
खऱ्या शिवसेनेत येऊन
विचारांशी निष्ठा ठेवीलनाहीच राहू शकत तिथे
खरे कार्यकर्ते आता
स्मशान शांतता पसरणार तिकडे
मारोत कुणी काही बातासुपडा साफ होणार आणि
तुमचे उखळ पांढरे होणार
‘उठा’ तुमच्यावर लवकरच
झोपायची वेळ येणारED चा फेरा ठेपलाच आहे… pic.twitter.com/5PwBC1nsQk
— Naresh Mhaske (@nareshmhaske) June 27, 2023
READ ALSO :
हेही वाचा…राष्ट्रवादी काॅंग्रेसला मोठा झटका, बंडखोरी केल्याने ते ‘१८’ नगरसेवक अपात्र, ६ वर्षांसाठी निलंबित
हेही वाचा…“इलाका हमारा, आवाज भी हमारा, नाम याद रखना”, ठाकरेंची शाखा पाडली, शिवसैनिकांकडून अधिकाऱ्याला मारहाण
हेही वाचा…“शरद पवारांनी केली ती मुत्सद्देगिरी अन् एकनाथ शिंदेंनी केली ती…”, देवेंद्र फडणवीसांचा शरद पवारांवर पलटवार
हेही वाचा…सोलापुरात राष्ट्रवादीला मोठा धक्का बसणार, शरद पवारांच्या पट्टशिष्याचा मुलगा BRS मध्ये
हेही वाचा…“मनात राग आहे, की मुंबईचा पैसा हा दिल्लीश्वराच्या सांगण्यावरून लुटला जातोय”, आदित्य ठाकरे