मुंबई : गेल्या काही दिवसापासून ठाकरेंच्या शाखेवर कारवाई केली जात आहे. यातच आता वांद्रे पुर्व येथील ठाकरे गटाच्या शाखेवर मुंबई महानगरपालिकेवर कारवाई केली असता शिवसैनिकांनी अधिकाऱ्यांना चोपलं. यावरून राज्यात आता नवा वाद निर्माण झाला आहे. यातच आता शिवसेनेचे विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी राज्य सरकारला इशारा दिला आहे.
हेही वाचा…“माझी श्रद्धा आता नरेंद्र मोदी, देवेंद्र फडणवीस आणि भाजपवर”, आशिष देशमुखांचं विधान
वांद्रे पुर्व येथील शाखेत छत्रपती शिवाजी महाराजांची मुर्ती आणि बाळासाहेब ठाकरे यांची प्रतिमा होती. कारवाई करतांना महाराजांची मुर्ती आणि बाळासाहेबांची प्रतिमा बाहेर नेण्याची मागणी कार्यकर्त्यांनी अधिकाऱ्यांना केली, मात्र कार्यकर्त्यांच्या मागणीकडे दुलर्क्ष करत अधिकाऱ्यांना शाखेवर कारवाई केली. त्यानंतर ठाकरे गटाच्या शिवसैनिकांनी अधिकाऱ्यांना मारहाण केली.
हेही वाचा…“द गद्दार फाईल्स..!” काय म्हणावे, असुरांना…? तुम्हीच सांगा..! शिंदेंच्या बंडावरून दानवे संतापले
दरम्यान, त्यावर अंबादास दानवे म्हणाले की, शिवसेनेला दादागिरी शिकवायची नाही, तो आमचा धंदा आहे. हे वाक्य दादा कोंडके यांनी सांगितले होते. बोगस कार्यक्रम असल्याचे सांगून एकट्या महिलेला चोप देणारी औलाद आम्ही नाहीत. आम्ही देतो ती भर बाजारात. ती पण अशी. इलाका हमारा, आवाज भी हमारा, नाम याद रखना असली वाली शिवसेना असं दानवे यांनी म्हटलं आहे.
‘शिवसेनेला दादागिरी शिकवायची नाही, तो आमचा धंदा आहे’, हे वाक्य दादा कोंडके यांनी सांगितले होते.
बोगस कार्यक्रम असल्याचे सांगून एकट्या महिलेला चोप देणारी औलाद आम्ही नाहीत. आम्ही देतो ती भर बाजारात.. ती पण अशी!इलाका हमारा, आवाज भी हमारा!! नाम याद रखना ‘असली वाली शिवसेना… https://t.co/Hr5dw1cbV6
— Ambadas Danve (@iambadasdanve) June 27, 2023
READ ALSO :
हेही वाचा…“शरद पवारांनी केली ती मुत्सद्देगिरी अन् एकनाथ शिंदेंनी केली ती…”, देवेंद्र फडणवीसांचा शरद पवारांवर पलटवार
हेही वाचा…सोलापुरात राष्ट्रवादीला मोठा धक्का बसणार, शरद पवारांच्या पट्टशिष्याचा मुलगा BRS मध्ये
हेही वाचा…“मनात राग आहे, की मुंबईचा पैसा हा दिल्लीश्वराच्या सांगण्यावरून लुटला जातोय”, आदित्य ठाकरे
हेही वाचा…“राज्यातील विरोधकांची महाविकास आघाडी म्हणजे कावळा, घुबड व सरड्याची अभद्र युती”
हेही वाचा…“देशात स्वातंत्र्यानंतरच्या सर्वात शक्तीशाली प्रधानमंत्री म्हणजे इंदिरा गांधी “, शरद पवार