नागपूर : काॅंग्रेसमधील निलंबित आमदार आशिष देशमुखांनी भाजपमध्ये प्रवेश केल्यानंतर आता ते नाना पटोलेंवर जोरदार तुटून पडत आहेत. काॅंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले आणि खासदार राहुल गांधी यांच्यावर टिका केल्यानंतर देशमुखांना काॅंग्रेसमधून निलंबित करण्यात आलं. त्यावर आता मी भाजपमध्ये अविरतपणे राहायला आलो असल्याचं आशिष देशमुखांनी म्हटलं आहे.
हेही वाचा…“वेदांता फॉक्सकॉन घालवला आता मायक्रॉन तरी महाराष्ट्रात आणा,” नाना पटोलेंचं एकनाथ शिंदेंना पत्र
भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून विकासाची गंगा ही विदर्भापर्यंत आता पोहोचली आहे. त्याचा फायदा आपल्या येथे शेतकऱ्यांना येथील तरुणाईला नक्कीच होतो आहे. अशा या परिस्थितीमध्ये मी काँग्रेसमध्ये होतो, पण मी आता परवाच्या दिवशी भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश घेतला आणि म्हणून जिथे विकास होईल जिथे विदर्भाला न्याय देण्याचे काम होईल, तिथे नक्कीच आपण गेलं पाहिजे. हा उद्देश्य घेऊन आपण येथे आलो आहे. असं आशिष देशमुख यांनी म्हटलं आहे.
हेही वाचा…“10 कोटींची ऑफर नाकारल्याने शाखा तोडली”, ठाकरे गटातील माजी नगरसेवकाचा शिंदेंवर आरोप
भाजपमध्ये मी आता अविरतपणे याठिकाणी राहायला आलो आहे. माझी श्रद्धा आता नरेंद्र मोदी, देवेंद्र फडणवीस आणि भाजपवर आहे. पक्षासाठी माझ्यावर राज्याची जबाबदारी मिळाली आहे. आणि अतिशय ऊर्जावाद पद्धतीने ते संपूर्ण बुध लेवल पर्यंत पक्षाला कार्यान्वित करण्याकरता घटक आपल्या समाजातली असो त्यांच्यापर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करेन. असंही ते म्हणाले.
हेही वाचा…“२०२४ ला पुन्हा एकनाथ शिंदेंच मुख्यमंत्री होणार”, शिंदे गटातील आमदारांनी शड्डू ठोकला
भारतीय जनता पार्टीच्या मुख्य प्रवाहामध्ये जोडण्यासाठी सातत्याने काम करा आणि माझ्यासारखा कार्यकर्ता जर कुठे कोण्या पक्षावर नाराज असेल. त्यांना सातत्याने पक्षात आणण्याची भूमिका घेतात. या पलीकडे आमचे काँग्रेसचे विद्यमान प्रदेशातील जो जात असेल नसेल जात तर त्याला आणि आज त्यांची एवढी केवील वाणी मला परत पुनर्नियुक्ती वरच्या काँग्रेसवाल्यांनी केली आणि मग अशा परिस्थितीमध्ये नाना पटोले यांनी चुल्लूवर पाण्यामध्ये डुबल पाहिजे आणि राजीनामा देऊन आपली विदर्भावरील अस्मिता जागृत ठेवली पाहिजे असंही ते म्हणाले.
READ ALSO :
हेही वाचा…“द गद्दार फाईल्स..!” काय म्हणावे, असुरांना…? तुम्हीच सांगा..! शिंदेंच्या बंडावरून दानवे संतापले
हेही वाचा…“अशोक चव्हाण यांना पुन्हा राज्याचे मुख्यमंत्री म्हणून बघायचंय”
हेही वाचा…“राष्ट्रवादीचं प्रदेशाध्यक्ष पद दिलं तर काम करेन,” छगन भुजबळांनी व्यक्त केली इच्छा
हेही वाचा…“राष्ट्रवादीने काॅंग्रेसचा युवा कार्यकर्ता फोडला,” जंयत पाटलांच्या उपस्थितीत पक्ष प्रवेश
हेही वाचा…“काॅंग्रेसच्या कार्यकर्त्यांना पटोलें लाथा मारून हाकलतात,” आशिष देशमुखांचा गंभीर आरोप