नाशिक : राज्याचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी विरोधी पक्षनेते पदापासून मुक्त करा, अशी मागणी अध्यक्ष शरद पवार यांच्याकडे केल्याने एकच चर्चा सुरू झाली आहे. काल राष्ट्रवादीचं वर्धापन दिन साजरा करण्यात आला. त्यावेळी अनेक नेत्यांनी भाषणं केलीत. यावेळी अजित पवार यांनी थेट अशी मागणी केल्याने त्यांचा डोळा प्रदेशाध्यक्ष पदावर आहे का ? असा सवालही उपस्थित करण्यात आले.
हेही वाचा…“उद्धव ठाकरेंचा ऐकरी उल्लेख असलेले ते बॅनर कुणी लावले ? “औरंगजेबचाही फोटो
कालच्या भाषणात अजित पवार यांनी राष्ट्रवादीच्या प्रदेशाध्यक्षपदाच्या कालावधीत किती आमदार, किती खासदार निवडून आले. याची आकडेवारी समोर मांडली. यावेळी अजित पवार यांनी प्रदेशाध्यक्ष जयंत पाटलांना पाच वर्ष होऊन एक महिना झाला असल्याचं सांगितलं. तर आता मला विरोधी पक्षनेते पदाबाबत रस राहिला नसून मला या पदापासून मुक्त करा, पक्ष संघटनेत कोणत्याही पदावर काम करायचं आहे. असं अजित पवार यांनी सांगितलं. त्यावर छगन भुजबळ यांनी प्रदेशाध्यक्ष पदाची इच्छा व्यक्त केली आहे.
हेही वाचा…“अरे, बाबा..! मोदीजी देश चालवातयत, फक्त साडेतीन जिल्हे नाही”, मेघना बोर्डीकरांचा रोहित पवारांना टोला
आमचा पक्ष लोकशाहीने चालणारा पक्ष आहे. प्रत्येकाला आपलं मत मांडण्याचा अधिकार आहे. त्यांना वेगळ पद किंवा काम करायचं आहे पण ते पक्षातच काम करणार म्हणतात. माझं मत सुद्धा मी मांडतो, मला फक्त चार महिने अध्यक्षपद मिळालं. भाजपने बावनकुळे यांच्यासारख्या ओबीसी नेत्याला अध्यक्ष केलं. काॅंग्रेसने सुद्धा दिलं. आमच्या पक्षात सुद्धा ओबीसी नेते आहेत. त्यांना सुद्धा संधी दिली पाहिजे. सुनील तटकरे, धनंजय मुंडे, जितेंद्र आव्हाड आहेत, मला दिलं तर मी सुद्धा काम करेन. छोट्या समाजाला अध्यक्षपद दिलं पाहिजे असं मला वाटतं असं छगन भुजबळ यांनी म्हटलं आहे.
READ ALSO :
हेही वाचा…“राष्ट्रवादीने काॅंग्रेसचा युवा कार्यकर्ता फोडला,” जंयत पाटलांच्या उपस्थितीत पक्ष प्रवेश
हेही वाचा…“काॅंग्रेसच्या कार्यकर्त्यांना पटोलें लाथा मारून हाकलतात,” आशिष देशमुखांचा गंभीर आरोप
हेही वाचा…“वेदांता फॉक्सकॉन घालवला आता मायक्रॉन तरी महाराष्ट्रात आणा,” नाना पटोलेंचं एकनाथ शिंदेंना पत्र
हेही वाचा…“10 कोटींची ऑफर नाकारल्याने शाखा तोडली”, ठाकरे गटातील माजी नगरसेवकाचा शिंदेंवर आरोप
हेही वाचा…“२०२४ ला पुन्हा एकनाथ शिंदेंच मुख्यमंत्री होणार”, शिंदे गटातील आमदारांनी शड्डू ठोकला