मुंबई : वेदांता फॉक्सकॉन घालवला आता मायक्रॉन तरी महाराष्ट्रात आणा. असं म्हणत काॅंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे पत्राद्वारे मागणी केली आहे. मागील काही महिन्यात महाराष्ट्रातून अनेक प्रकल्प बाहेरील राज्यात गेल्याने राज्यातील विरोधी पक्षातील नेत्यांनी सरकारवर टिकास्त्र सोडलं. यातच आता नाना पटोले यांनी थेट यासंदर्भात मुख्यमंत्र्यांना पत्र पाठवलं आहे.
हेही वाचा…“एक बहिण म्हणून मला आनंद, मी त्याच्यापाठीमागे,” अजित पवारांच्या त्या विधानावर सुळेंचा पाठिंबा
वेदांता फॉक्सकॉन घालवला आता मायक्रॉन तरी महाराष्ट्रात आणा. महाराष्टर राज्य गुंतवणुकीसाठी देशात आघाडीचे राज्य आहे. परदेशी गुंतवणुकीसाठी महाराष्टर आजही पहिल्या क्रमांकाचे राज्य आहे. मागील वर्षात काही महत्वाचे प्रकल्प राज्याबाहेर गेले. मात्र आता एक संधी महाराष्ट्रासाठी चालून येत आहे. केंद्रीय मंत्रीमंडळाने २२ हजार कोटी रुपयांच्या मायक्रॉन सेमीकंडक्टर चिप निर्मिती प्रकल्पाला मंजुरी दिली असून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अमेरिका दौऱ्यात यावर शिक्कामोर्तब होईल. मायक्रॉन प्रकल्पाची गुंतवणुक महाराष्ट्रातच व्हावी यासाठी राज्य सरकारने सर्वतोपरी प्रयत्न करावा, अशी मागणी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नाना पटोले यांनी केली आहे.
हेही वाचा…“निवडणुका आल्या की दंगली घडविण्याचे प्रकार सुरु केले जातात”, छगन भुजबळांचा हल्लाबोल
महाराष्ट्रात येणारा वेदांता फॉक्सकॉनचा सेमीकंडक्टर चीपचा प्रकल्प गुजरातला गेला. या प्रकल्पाच्या माध्यमातून १. ५ लाख कोटी रुपयांची गुंतवणूक होणार होती व लाखो बेरोजगार तरुणांना रोजगार मिळणार होते. तसेच पूरक उद्योगांमधूनही मोठया प्रमाणात रोजगार मिळणार होते पण हा प्रकल्प गुजरातला गेल्यामुळे महाराष्ट्राचे मोठे नुकसान झाले आहे. ते नुकसान भरून काढण्यासाठी मायक्रॉन प्रकल्पाची गुंतवणुक महाराष्ट्रात व्हावी यासाठी महाराष्ट्र सरकारने प्रयत्न करायला हवेत. महाराष्ट्रातील पुणे परिसरात या प्रकल्पासाठी अत्यंत अनुकुल वातावरण आहे. पुणे हे औद्योगीक क्लस्टर असून विमानतळ, बंदरे आणि रस्ते वाहतुकीच्या दृष्टीने सोयीचे ठिकाण आहे. या प्रकल्पासाठी आवश्यक असणारे कुशल मनुष्यबळ, त्यांना आवश्यक सोयी सुविधा या परिसरात उपलब्ध आहेत. त्यामुळे गुंतवणूक करणा-या कंपनीसाठी इथे प्रकल्प लवकर उभा करून उत्पादन सुरु करणे सोपे होणार आहे. असंही नाना पटोले यांनी म्हटलं आहे.
मायक्रॉन सेमीकंडक्टर प्रकल्प महाराष्ट्रात आणण्यासाठी प्रयत्न करा
काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना पत्र.
वेदांता फॉक्सकॉन घालवला आता मायक्रॉन तरी महाराष्ट्र आणा.
महाराष्ट्र राज्य गुतंवणुकीसाठी देशात आघाडीचे राज्य आहे. परदेशी गुतंवणीसाठीही… pic.twitter.com/ovxbBwhrA7
— Maharashtra Congress (@INCMaharashtra) June 22, 2023
READ ALSO :
हेही वाचा…“10 कोटींची ऑफर नाकारल्याने शाखा तोडली”, ठाकरे गटातील माजी नगरसेवकाचा शिंदेंवर आरोप
हेही वाचा…“२०२४ ला पुन्हा एकनाथ शिंदेंच मुख्यमंत्री होणार”, शिंदे गटातील आमदारांनी शड्डू ठोकला
हेही वाचा…“उद्धव ठाकरेंचा ऐकरी उल्लेख असलेले ते बॅनर कुणी लावले ? “औरंगजेबचाही फोटो
हेही वाचा…“अरे, बाबा..! मोदीजी देश चालवातयत, फक्त साडेतीन जिल्हे नाही”, मेघना बोर्डीकरांचा रोहित पवारांना टोला
हेही वाचा…साताऱ्यातील दोन राजे भिडले, फडणवीसांची घेतली भेट, फडणवीस म्हणाले की, “असं गंभीर…”