पुणे : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा सरकार आल्यानंतर महाराष्ट्रातील अनेक प्रकल्प बाहेरच्या राज्यात गेल्याचा आरोप विरोधकांनी केला. याच दरम्यान महाराष्ट्रातील प्रकल्प गुजरातला गेल्याचा आरोप देखील विरोधकांनी केला होता. याच सोबतच आता Berkshire_Hathaway. ची उपकंपनी असलेल्या Lubrizol_Corporation 1230 कोटींची गुंतवणूक असलेला जगातील सर्वात मोठा सर्वात मोठा CPVC रेसीन प्लांट गुजरातमध्ये उभारण्याची घोषणा केली आहे. यावरून आता राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांनी भाजपला खोचक टोला हाणला आहे. त्यावर रोहित पवारांना आता भाजपच्या आमदारानी जोरदार प्रत्युत्तर दिलं आहे.
हेही वाचा…“२५ वर्ष युतीत घालवली त्या शिवसेनेला संपवायला सुद्धा मागेपुढे न पाहणारा ‘भाजप’ पक्ष किती राक्षसी वृत्तीचा”
नामांकित उद्योजकांच्या घराजवळ जिलेटीन ठेवले की राज्यात उद्योग वाढतात, हे खरं आहे का रोहित पवार? वसुली सरकारने किती प्रकल्प आणले महाराष्ट्रात? पंतप्रधानांना सल्ले देण्याआधी स्वत:ची पात्रता बघावी. मोदीजींच्या नेतृत्वात देशाची अर्थव्यवस्था जगात पाच व्या क्रमांकावर आहे. देवेंद्र फडणवीस यांच्या कर्तृत्वाने एफडीआयने महाराष्ट्र नंबरवर आला आहे. अरे, बाबा मोदीजी देश चालवातयत, फक्त साडेतीन जिल्हे नाही. असा खोचक टोला भाजप आमदार मेधना बोरडीकर यांनी रोहित पवारांना लगावला.
हेही वाचा…“अजित दादांनी प्रदेशाध्यक्षपदावर दावा ठोकला, जयंत पाटील भर भाषणात गडबडले”, विरोधी पक्षनेते पद सोडणार
“ज्या राज्यात निवडणुका असतात त्या राज्यात गुंतवणूक देण्याकडे केंद्र सरकारचा असलेला कल बघता महाराष्ट्रातील आगामी निवडणुका विचारात घेता आपण प्रयत्न केले असते. तर कदाचित तळोजामधील Lubrizol_ झोनचा प्लांट आणता आला असता असं रोहित पवार यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना सुनावला आहे. परंतु कदाचित आपल्या राज्यात औरंगजेब धार्मिक तणाव या गोष्टींनी काम भागवू शकते. याची खात्री राज्यातील सत्ताधाऱ्यांनी केंद्राला पटवून दिली असावी. म्हणूनच केंद्राने निवडणुका असूनही महाराष्ट्र कडे दुर्लक्ष केले असावे. असा खोचक टोला देखील रोहित पवार यांनी लगावला आहे.
हेही वाचा…मोठी बातमी..! विरोधी पक्षनेते पदावरून मुक्त करा, अजित पवारांची शरद पवारांकडे मागणी
पुढे बोलताना रोहित पवार म्हणाले की, Berkshire_Hathaway ने 16000 कोटीचा करार केला असल्याचे आपले सरकार सांगत आहे. किमान ती गुंतवणूक तरी प्रत्यक्षात आणण्यासाठी राज्य शासनाने मन लावून काम करायला हवे,. असे देखील रोहित पवार यांनी म्हटले आहे. यातच पंतप्रधान नरेंद्र मोदी परदेश दौऱ्यावर असून त्यांनी ट्विटरचे सीईओ, इलन मस्क यांची भेट घेतली आहे. त्यावरूनही त्यांनी भाष्य केलं आहे.
नामांकित उद्योजकांच्या घराजवळ जिलेटीन ठेवले की राज्यात उद्योग वाढतात, हे खरं आहे का @RRPSpeaks? वसुली सरकारने किती प्रकल्प आणले महाराष्ट्रात? पंतप्रधानांना सल्ले देण्याआधी स्वतःची पात्रता बघावी. मोदीजींच्या नेतृत्वात देशाची अर्थव्यवस्था जगात ५ व्या क्रमांकावर आहे. @Dev_Fadnavis… https://t.co/AnlrYWRH1E
— Meghna Sakore Bordikar (@MeghnaBordikar) June 22, 2023
READ ALSO :
हेही वाचा…साताऱ्यातील दोन राजे भिडले, फडणवीसांची घेतली भेट, फडणवीस म्हणाले की, “असं गंभीर…”
हेही वाचा…“एक बहिण म्हणून मला आनंद, मी त्याच्यापाठीमागे,” अजित पवारांच्या त्या विधानावर सुळेंचा पाठिंबा
हेही वाचा…“निवडणुका आल्या की दंगली घडविण्याचे प्रकार सुरु केले जातात”, छगन भुजबळांचा हल्लाबोल
हेही वाचा…“अजित पवारांना प्रदेशाध्यक्ष पद दिलं तर राष्ट्रवादीचे ‘१००’ आमदार निवडून आणतील”
हेही वाचा…“केसीआर अन् वंचितबाबत सावध रहा,” अजित पवारांच्या कार्यकर्त्यांना सुचना