मुंबई : मला राज्याच्या विरोधी पक्षनेत्यांमध्ये फार काहीच रस नव्हता. पंरतु आमदारांनी आग्रह केला, आणि त्यांनी त्यावर सह्या केल्या. बाकीच्या मंडळींनी देखील सांगितल्यानंतर विरोधी पक्षनेतेपद घेतलं. परंतु आता मला विरोधी पक्षनेत्यापासून मुक्त करा. आणि संघटनेत कोणतीही जबाबदारी द्या. असं राज्याचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी म्हटलं आहे. आज राष्ट्रवादीचा वर्धापन दिन साजरा करण्यात आला. त्यावेळी ते बोलत होते.
हेही वाचा…“राहुल गांधी पंतप्रधान झाले तर सर्वांना तुरूंगात टाकायला सोपं होईल”, नाना पटोले
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मंत्रिपदाची शपथ घेतल्यानंतर राष्ट्रवादीने अजित पवार यांच्याकडे विरोधी पक्षनेते सोपवलं. त्यानंतर राज्यात अनेक घटना घडल्या. परंतु अजित पवार पुर्ण तादकीने काम करत नसल्याचा आरोप करण्यात आला. यातच अजित पवार हे फडणवीस आणि शिंदे यांच्याविरोधात आक्रमक भूमिका घेत नाहीत. असंही सांगण्यात आलं. यावरून आज अजित पवार यांनी विरोधी पक्षनेतेपदावरून मुक्त करा, अशी मागणी अजित पवार यांनी केली आहे.
हेही वाचा…साताऱ्यात दोन राजे भिडले, एकाने नारळ फोडले तर दुसऱ्याने ऑफिस, कार्यकर्त्यांमध्ये मोठा राडा
दरम्यान, 25 वर्षाच्या राजकीय जीवनामध्ये माझ्या मनाला दुःख आहे की कधी कधी मी विचार करतो. की ममता बॅनर्जी एकट्याच्या जीवावर पश्चिम बंगाल घेऊ शकते. आपच्या मुख्यमंत्र्यांनी पंजाब अन् दिल्ली काबीज केली. नितीश कुमार देखील बऱ्यापैकी बिहारमध्ये त्या ठिकाणी वर्चस्व निर्माण करू शकतो. त्याच्या संदर्भामध्ये अनेक इकडं या सगळ्या नेत्यांची नावे घेतल्यानंतर त्याच्या सगळ्यात उजवा नेता म्हणून तर आदरणीय पवार साहेबांना आहे. असं अजित पवार म्हणाल्या. तेवढ्यात खाली बसलेल्या कार्यकर्त्यांनी शिट्ट्या मारल्या. त्यावरही अजित पवार संतापले. शिट्ट्या मारतात. टाळ्या मारतात. तुम्ही सगळे म्हणतात. पण कधी आपल्या एकट्याच्या ताकदीवर आपण आपला राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष राज्यामध्ये निवडून आणू शकता का ? त्याच्यामध्ये आपणच कुठे कमी पडतो ? आपण विदर्भामध्ये कमी पडतो आपण मुंबईमध्ये कमी पडतो. आज देखील मुंबईच्या आज पंचविसावा वर्धापन दिना पण 24 पूर्ण करून पंचवीस हजार पण करतोय. परंतु अजूनही मुंबईचा अध्यक्ष नाहीये. असंही अजित पवार म्हणाले.
READ ALSO :
हेही वाचा…शिट्या मारतात, टाळ्या वाजवतात, परंतु एकट्याच्या ताकदीवर राष्ट्रवादी निवडून आणता का ? अजित पवारांनी कार्यकर्त्यांनाच सुनावले
हेही वाचा…छगन भुजबळ साहेब..! ओबीसी आरक्षणाचं काय झालं, ? सुप्रिया सुळेंचा भुजबळांना सवाल
हेही वाचा…“पुढचा मुख्यमंत्री हा राष्ट्रवादीचाच असला पाहिजे”, खासदार अमोल कोल्हेंचं विधान
हेही वाचा…“संयम बाळगा, कायद्याच्या चौकटीत रहा,” देवेंद्र फडणवीसांचा गीता जैन यांना सल्ला
हेही वाचा…“आधी धमकवले, मग काॅलर पकडली, अन् थोबाडात मारली..!” महिला आमदाराचा व्हिडीओ व्हायरल