मुंबई : आमदार गीता जैन यांनी पालिकेच्या कनिष्ठ अभियंत्याला भर रस्त्यात मारहाण केल्याची घटना घडली आहे. या मारहाणीचा व्हिडीओ सोशल मीडियावर देखील प्रचंड व्हायरल होत आहे. यावरून आता गीता जैन यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची मागणी होत आहे. तर राज्यातील राजकीय नेत्यांनी देखील यावर आपली प्रतिक्रिया दिली आहे.
हेही वाचा…आमदारांना थांबवण्यासाठी उद्धव ठाकरेंकडे गेलो पण… गुलाबराव पाटलांनी सांगितला ‘तो’ किस्सा
काशिमीरा येथील अनधिकृत बांधकामावर कारवाई करण्याची मोहिम पालिकेने हाती घेतली आहे. यादरम्यान एका झोपडपट्टी बांधकामावर मंगळवारी कारवाई करण्यात आली. त्यावरून गीता जैन आक्रमक झाल्या अन् कनिष्ठ अभियंत्याला मारहाण केली. त्यावर राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांनी नाराजी व्यक्त केली आहे.
हेही वाचा…आघाडीत काय चाललंय? “अमोल मिटकरींमध्ये उद्याचा ‘संजय राऊत’ दिसतोय,” काॅंग्रेस नेत्यांनीच केली टिका
लोकांचे प्रश्न सुटलेच पाहिजेत आणि त्यासाठी अनेक सनदशीर मार्गही उपलब्ध आहेत. पण सनदशीर मार्गाने प्रश्न सोडवण्याऐवजी कायदा बनवणाऱ्यानेच तो हातात घेणं हे कोणत्याही लोकप्रतिनिधीला शोभत नाही. राज्यात कुणी पिस्तुल हाती घेतंय. कुणी अधिकाऱ्यांना मारहाण करतंय तर कुणी धमकावतंय, हे पाहतांना आपला महाराष्ट्र कुठं चाललाय, याची चिंता वाटते असंही रोहित पवार यांनी म्हटलं आहे.
लोकांचे प्रश्न सुटलेच पाहिजेत आणि त्यासाठी अनेक सनदशीर मार्गही उपलब्ध आहेत. पण सनदशीर मार्गाने प्रश्न सोडवण्याऐवजी कायदा बनवणाऱ्यानेच तो हातात घेणं हे कोणत्याही लोकप्रतिनिधीला शोभत नाही. राज्यात कुणी पिस्तूल हाती घेतंय, कुणी अधिकाऱ्यांना मारहाण करतंय तर कुणी धमकावतंय… हे… pic.twitter.com/eUiTRLFX08
— Rohit Pawar (@RRPSpeaks) June 21, 2023
READ ALSO :
हेही वाचा…“राहुल गांधी पंतप्रधान झाले तर सर्वांना तुरूंगात टाकायला सोपं होईल”, नाना पटोले
हेही वाचा…साताऱ्यात दोन राजे भिडले, एकाने नारळ फोडले तर दुसऱ्याने ऑफिस, कार्यकर्त्यांमध्ये मोठा राडा
हेही वाचा…“..तर एकनाथ शिंदेंनी स्वत:च्या डोक्यात गोळी घालून आत्महत्या केली असती,” मंत्र्यांचा खळबळजनक दावा
हेही वाचा…“१२३० कोटींची गुंतवणुक असलेला प्रकल्प गुजरातमध्ये, आपल्या राज्यात फक्त औरंगजेब अन् धार्मिक तणाव,” राष्ट्रवादीची टिका
हेही वाचा…कोविड काळात महाघोटाळा,? आदित्य ठाकरेंच्या निकवर्तीयांवर इडीचा छापा