मुंबई : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेविरोधात केलेल्या बंडखोरीला काल एक वर्ष पुर्ण झालं आहे. यानिमित्ताने काल राष्ट्रवादी आणि ठाकरे गटाकडून जागतिक गद्दार दिवस साजरा करण्यात आला आहे. तर शिंदे गटाकडून स्वाभिमान दिवस साजरा करण्यात आला. याच पार्श्वभूमीवर शिंदे गटातील आमदार आणि मंत्री गुलाबराव पाटील यांनी यावर भाष्य केलं आहे.
हेही वाचा…ठाकरेंनी बोलवलेल्या बैठकीत ५ ते ६ माजी नगरसेवक गैरहजर, चर्चांना उधाण
दिवंगत बाळासाहेब ठाकरे यांनी जी शिवसेना बांधली ती कुठेतरी लयास जात आहे. असा विषय आल्यावर आम्हाला वाईट वाटलं. सुरूवातीला जेव्हा काही आमदार गेले, तेव्हा आम्ही सांगून सुद्धा कोणीतरी एखादा तीनपाट माणूस उद्धव ठाकरे यांना सल्ला देत असेल तर ते त्याचं ऐकत असतील तर काय होणार. असं सवाल करत गुलाबराव पाटलांनी संजय राऊतांना टोला हाणला.
हेही वाचा…ठाकरे गटाचा मनपावर 1 जुलै ला विराट मोर्चा, आदित्य ठाकरे नेतृत्व करणार
दरम्यान, गुलाबराव पाटील म्हणाले की, आमदारांना थांबवण्याचा प्रयत्न करा म्हणून आम्ही उद्धव ठाकरे यांना सांगायला गेलो तर उलट मलाच सांगितलं. तुम शेर जैसे दिखते हो, लेकीन चुहे जैसा है, तुला जायचं असेल तर तू जाऊ शकतो . हे संजय राऊतांचं वाक्य आहे. या महामंडलेश्वर १००८ ने पुर्ण शिवसेनेची वाट लावली आहे. त्यामुळेच शिवसेनेला हे दिवस आले आहेत. असंही गुलाबराव पाटील म्हणाले.
READ ALSO :
हेही वाचा…आघाडीत काय चाललंय? “अमोल मिटकरींमध्ये उद्याचा ‘संजय राऊत’ दिसतोय,” काॅंग्रेस नेत्यांनीच केली टिका
हेही वाचा…“गद्दारीचे पहिले आदिपुरूष तर शरद पवार”, भाजप खासदाराची राष्ट्रवादीवर जहरी टिका
हेही वाचा…“गद्दारीचे पहिले आदिपुरूष तर शरद पवार”, भाजप खासदाराची राष्ट्रवादीवर जहरी टिका
हेही वाचा…“दरोडे टाकणाऱ्यांच्या तोंडी चोरीची भाषा शोभत नाही”, ठाकरेंच्या विराट मोर्चावर शिंदेंची प्रतिक्रिया
हेही वाचा…“गुलाबराव पाटलांना ५०० रुपयांचा दंड, एकनाथ खडसेंवर केलेले ते आरोप पाटलांना भोवले”