पुणे : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा सरकार आल्यानंतर महाराष्ट्रातील अनेक प्रकल्प बाहेरच्या राज्यात गेल्याचा आरोप विरोधकांनी केला. याच दरम्यान महाराष्ट्रातील प्रकल्प गुजरातला गेल्याचा आरोप देखील विरोधकांनी केला होता. याच सोबतच आता Berkshire_Hathaway. ची उपकंपनी असलेल्या Lubrizol_Corporation 1230 कोटींची गुंतवणूक असलेला जगातील सर्वात मोठा सर्वात मोठा CPVC रेसीन प्लांट गुजरातमध्ये उभारण्याची घोषणा केली आहे. यावरून आता राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांनी भाजपला खोचक टोला हाणला आहे.
हेही वाचा…“दरोडे टाकणाऱ्यांच्या तोंडी चोरीची भाषा शोभत नाही”, ठाकरेंच्या विराट मोर्चावर शिंदेंची प्रतिक्रिया
“ज्या राज्यात निवडणुका असतात त्या राज्यात गुंतवणूक देण्याकडे केंद्र सरकारचा असलेला कल बघता महाराष्ट्रातील आगामी निवडणुका विचारात घेता आपण प्रयत्न केले असते. तर कदाचित तळोजामधील Lubrizol_ झोनचा प्लांट आणता आला असता असं रोहित पवार यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना सुनावला आहे. परंतु कदाचित आपल्या राज्यात औरंगजेब धार्मिक तणाव या गोष्टींनी काम भागवू शकते. याची खात्री राज्यातील सत्ताधाऱ्यांनी केंद्राला पटवून दिली असावी. म्हणूनच केंद्राने निवडणुका असूनही महाराष्ट्र कडे दुर्लक्ष केले असावे. असा खोचक टोला देखील रोहित पवार यांनी लगावला आहे.
हेही वाचा…“गुलाबराव पाटलांना ५०० रुपयांचा दंड, एकनाथ खडसेंवर केलेले ते आरोप पाटलांना भोवले”
पुढे बोलताना रोहित पवार म्हणाले की, Berkshire_Hathaway ने 16000 कोटीचा करार केला असल्याचे आपले सरकार सांगत आहे. किमान ती गुंतवणूक तरी प्रत्यक्षात आणण्यासाठी राज्य शासनाने मन लावून काम करायला हवे,. असे देखील रोहित पवार यांनी म्हटले आहे. यातच पंतप्रधान नरेंद्र मोदी परदेश दौऱ्यावर असून त्यांनी ट्विटरचे सीईओ, इलन मस्क यांची भेट घेतली आहे. त्यावरूनही त्यांनी भाष्य केलं आहे.
हेही वाचा…ठाकरेंनी बोलवलेल्या बैठकीत ५ ते ६ माजी नगरसेवक गैरहजर, चर्चांना उधाण
पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांचं हे ट्विट पाहून खूप आनंद झाला.. राज्यात बेरोजगारी वाढली असताना गेल्या वर्षभरात महाराष्ट्रातील अनेक मोठे प्रकल्प अन्य राज्यात आणि तेही प्रामुख्याने गुजरातमध्ये गेले आहेत.. त्यामुळं इथल्या युवांचा हक्काचा रोजगार हिरावला गेला… त्यांचं हे नुकसान काही प्रमाणात भरून काढण्यासाठी टेस्ला च्या प्रकल्पावर स्वाभाविकपणे महाराष्ट्राचाच हक्क आहे.. शिवाय येथील पायाभूत सुविधांचा विचार करता टेस्ला सोबत बोलणी करताना महाराष्ट्रच डोळ्यासमोर ठेवून बोलणी करावी. कोणत्याही पंतप्रधानांना परदेशात मिळणारा मान-सन्मान हा त्यांच्या देशातील नागरिकांमुळे मिळत असतो आणि स्वाभाविकच त्यात महाराष्ट्रातील नागरिकांचाही समावेश आहे. त्यामुळं गेल्या काही महिन्यांपासून महाराष्ट्रावर सातत्याने झालेला अन्याय दूर करण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब आपण प्रयत्न करावेत, ही राज्याचा एक नागरिक म्हणून आपणास नम्र विनंती! तसंच या प्रकल्पासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही केंद्र सरकारकडे आग्रह धरावा, अशी विनंती रोहित पवारांनी केली आहे .
पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांचं हे tweet पाहून खूप आनंद झाला.. राज्यात बेरोजगारी वाढली असताना गेल्या वर्षभरात महाराष्ट्रातील अनेक मोठे प्रकल्प अन्य राज्यात आणि तेही प्रामुख्याने गुजरातमध्ये गेले आहेत.. त्यामुळं इथल्या युवांचा हक्काचा रोजगार हिरावला गेला… त्यांचं हे नुकसान काही… pic.twitter.com/P76VdJrXHV
— Rohit Pawar (@RRPSpeaks) June 21, 2023
#Berkshire_Hathaway ची उपकंपनी असलेल्या #Lubrizol_Corporation ने १२३० कोटींची गुंतवणूक असलेला जगातला सर्वात मोठा CPVC रेसीन प्लांट गुजरात मध्ये उभारण्याची घोषणा केली आहे.
ज्या राज्यात निवडणुका असतात त्या राज्यात गुंतवणूक देण्याकडे केंद्र सरकारचा असलेला कल बघता, महाराष्ट्रातील… pic.twitter.com/L4QHkIIMx9
— Rohit Pawar (@RRPSpeaks) June 21, 2023
READ ALSO :
हेही वाचा…कोविड काळात महाघोटाळा,? आदित्य ठाकरेंच्या निकवर्तीयांवर इडीचा छापा
हेही वाचा…आमदारांना थांबवण्यासाठी उद्धव ठाकरेंकडे गेलो पण… गुलाबराव पाटलांनी सांगितला ‘तो’ किस्सा
हेही वाचा…आघाडीत काय चाललंय? “अमोल मिटकरींमध्ये उद्याचा ‘संजय राऊत’ दिसतोय,” काॅंग्रेस नेत्यांनीच केली टिका
हेही वाचा…“गद्दारीचे पहिले आदिपुरूष तर शरद पवार”, भाजप खासदाराची राष्ट्रवादीवर जहरी टिका
हेही वाचा…“गद्दारीचे पहिले आदिपुरूष तर शरद पवार”, भाजप खासदाराची राष्ट्रवादीवर जहरी टिका