मुंबई : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेच्या विरोधात केलेल्या बंडाला २० जून रोजी एक वर्ष पूर्ण झालं आहे. एकनाथ शिंदे यांनी आपल्या शिवसेनेच्या 40 आणि 10 अपक्षांना घेऊन बंड केलं केलं होतं. त्याची आता चर्चा सर्व दूर केली जात आहे. मात्र बंड यशस्वी झालं नसतं तर एकनाथ शिंदेंनी स्वतःच्या डोक्यात गोळ्या झाडून आत्महत्या केली असती. असं वक्तव्य शिंदे सरकारमधील मंत्री दीपक केसरकर यांनी केलं आहे श. त्यानंतर राज्याच्या राजकारणात याची आता एकच चर्चा रंगली आहे. या पार्श्वभूमीवर खासदार संजय राऊत यांनी केसरकरांना जोरदार टोला हाणला आहे.
हेही वाचा…“गद्दारीचे पहिले आदिपुरूष तर शरद पवार”, भाजप खासदाराची राष्ट्रवादीवर जहरी टिका
“मला ज्यावेळी असं वाटायला लागलं की’ हा बंड यशस्वी होणार की नाही. त्यावेळी मी एकच गोष्ट केली असती. माझ्यासोबत आलेले आमदारांना परत पाठवलं असतं. मी एक फोन केला. असता माझी चुकी झाली आहे. परंतु या लोकांची काही चूक नाही आणि तिथेच मी माझ्या डोक्यात गोळी झाडून घेतली असती. असा म्हणणारा मनुष्य कुठल्या दर्जेचा असू शकतो. कशा रीतीची माणुसकी त्याच्याकडे असते. की माझ्यामुळे एकाही आमदाराचे नुकसान होऊ नये. राजकीय आमदारांचं नुकसान होता कामा नये. प्रसंगी माझं जीव गेला तरी चालेल . असा म्हणणारा माणसामागे लोक उभी राहणार नाही तर कोणाच्या मागे उभी राहणार”. असं केसरकरांनी म्हटले आहे.
हेही वाचा…“दरोडे टाकणाऱ्यांच्या तोंडी चोरीची भाषा शोभत नाही”, ठाकरेंच्या विराट मोर्चावर शिंदेंची प्रतिक्रिया
त्यावर संजय राऊत यांनी दीपक केसरकर यांना जोरदार हाणला आहे. “खरंतर याप्रकरणी दीपक केसरकर यांना पोलिसांनी ताबडतोब ताब्यात घेतलं पाहिजे. जर आत्महत्याचा विचार एखाद्या माणसांच्या डोक्यामध्ये घोळतोय आणि केसरकरांना माहिती आहे. आणि उद्या जर त्यांनी आत्महत्या केली तर यातच विधानसभेच्या अध्यक्षांनी घटनेला समोर धरून निकाल दिला तर तर ताबडतोब केसरकरांना पोलिसांनी आतापासून घेतलं पाहिजे आणि कारवाई केली पाहिजे. असं संजय राऊत यांनी म्हटले.
READ ALSO :
हेही वाचा…“१२३० कोटींची गुंतवणुक असलेला प्रकल्प गुजरातमध्ये, आपल्या राज्यात फक्त औरंगजेब अन् धार्मिक तणाव,” राष्ट्रवादीची टिका
हेही वाचा…कोविड काळात महाघोटाळा,? आदित्य ठाकरेंच्या निकवर्तीयांवर इडीचा छापा
हेही वाचा…आमदारांना थांबवण्यासाठी उद्धव ठाकरेंकडे गेलो पण… गुलाबराव पाटलांनी सांगितला ‘तो’ किस्सा
हेही वाचा…आघाडीत काय चाललंय? “अमोल मिटकरींमध्ये उद्याचा ‘संजय राऊत’ दिसतोय,” काॅंग्रेस नेत्यांनीच केली टिका
हेही वाचा…“गद्दारीचे पहिले आदिपुरूष तर शरद पवार”, भाजप खासदाराची राष्ट्रवादीवर जहरी टिका