मुंबई : शिवसेनेचे युवा नेते आदित्य ठाकरे यांचे निकटवर्तीय सुरज चव्हाण यांच्या घरी आज ईडीनी धाड टाकली आहे. याचबरोबर खासदार संजय राऊत यांचे देखील निकटवर्तीय सुजित पाठकरांच्या घरावर देखील ईडीने छापा टाकलाय. आज दिवसभरात ईडीने पंधरा ठिकाणी छापे टाकले असून पुढील चौकशी सुरू आहे. कोविड सेंटर वरील घोटाळ्याबाबत भाजप नेते किरीट सोमय्या यांनी आरोप केला होता. त्यानंतर ईडीने आता धाडसत्र सुरू केला आहे. यावर आता काॅंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे.
हेही वाचा…आघाडीत काय चाललंय? “अमोल मिटकरींमध्ये उद्याचा ‘संजय राऊत’ दिसतोय,” काॅंग्रेस नेत्यांनीच केली टिका
देशामध्ये बलच्याचं राजकारण सुरू आहे. या देशाला भ्रष्टाचार मुक्त करायचा असेल तर एक सोपं काम आता मोदी सरकारने केलेलं आहे. जे काय भ्रष्टाचारी लोक होतो. ज्यांच्यावर ईडी आणि सीबीआयच्या चौकशी सुरू झाल्या. त्यांच्यावर दबाव आणून भाजजपमध्ये दाखल करून घेतलं. त्यामुळे अनेक लोक भाजपचे नेते म्हणून एकत्रित आलेले आहेत. उद्या राहुल गांधी देशाचे पंतप्रधान झाले तर या सर्वांना जेलमध्ये टाकायला आम्हाला सोपे जाईल. असा टोला नाना पटोले यांनी भाजपला लगावला.
हेही वाचा…“गद्दारीचे पहिले आदिपुरूष तर शरद पवार”, भाजप खासदाराची राष्ट्रवादीवर जहरी टिका
पुढे बोलतांना ते म्हणाले की, जशाजशा निवडणुका जवळ येत आहेत. तसतसं विरोधकांना दाबण्याचा पुर्ण प्रयत्न केला जाईल. हे काही आता नवीन नाही. त्याचमुळे विरोधी पक्षातील नेत्यांच्या घरांवर ईडीच्या धाडी टाकण्यात येत आहेत. ही सगळी काही भीती आमच्या लक्षात आहे. त्यामुळे ईडीच्या दबावात विरोधी पक्ष येणार नाही. भाजपला सत्तेच्या बाहेर काढणं आज विरोधी पक्षाचा एकमेव अजेंडा आहे. असंही ते म्हणाले.
READ ALSO :
हेही वाचा…साताऱ्यात दोन राजे भिडले, एकाने नारळ फोडले तर दुसऱ्याने ऑफिस, कार्यकर्त्यांमध्ये मोठा राडा
हेही वाचा…“..तर एकनाथ शिंदेंनी स्वत:च्या डोक्यात गोळी घालून आत्महत्या केली असती,” मंत्र्यांचा खळबळजनक दावा
हेही वाचा…“१२३० कोटींची गुंतवणुक असलेला प्रकल्प गुजरातमध्ये, आपल्या राज्यात फक्त औरंगजेब अन् धार्मिक तणाव,” राष्ट्रवादीची टिका
हेही वाचा…कोविड काळात महाघोटाळा,? आदित्य ठाकरेंच्या निकवर्तीयांवर इडीचा छापा
हेही वाचा…आमदारांना थांबवण्यासाठी उद्धव ठाकरेंकडे गेलो पण… गुलाबराव पाटलांनी सांगितला ‘तो’ किस्सा