मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा २४ वर्षे पूर्ण करून २५ व्या वर्षात पदार्पण करत आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा वर्धापन दिन १० जूनला होता, त्यानिमित्त अहमदनगर येथे मोठा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. पंरतु तो होऊ शकला नाही. त्यामुळे १० जूनचा कार्यक्रम आज २१ जून रोजी आयोजित करण्यात आला आहे. या कार्यक्रमात राष्ट्रवादीचे आमदार आणि मंत्री छगन भुजबळ यांना खासदार सुप्रिया सुळे यांनी आरक्षणाबाबत प्रश्न केले आहेत.
हेही वाचा…“..तर एकनाथ शिंदेंनी स्वत:च्या डोक्यात गोळी घालून आत्महत्या केली असती,” मंत्र्यांचा खळबळजनक दावा
छगन भुजबळ तुम्ही सातत्याने आरक्षणावर बोलत असतात. परंतु ओबीसी आरक्षणाचं काय झालं, धनगर समाजाला तुम्ही न्याय देणार होते. तुम्ही कॅबिनेटमध्ये आरक्षण मिळणार होतं. त्याचा पुढे काय झालं. ? असा सवाल सुप्रिया सुळे यांनी छगन भुजबळ यांना केला आहे. धनगरांना आरक्षण देण्यासाठी ३० चा जो रिपोर्ट आहे. धनगर समाजाचा तो अजून सरकारने पल्बिश केलेला नाही आणि मी तुम्हाला ऑन रेकॉर्ड सांगते की मी स्वत: धनगर समाजाच्या बद्दल सातत्याने जेव्हा आरक्षणावर चर्चा होती. त्याच्यावर पाच दिवस सलग या देशात बोलणारी खासदार मी आहे. धनगर समाज, मराठ समाज, मुस्लिम समाज आणि लिंगायत समाज या सगळ्यांच्या आरक्षणाची मागणी मी केली आहे. असंही त्या म्हणाल्या.
हेही वाचा…“१२३० कोटींची गुंतवणुक असलेला प्रकल्प गुजरातमध्ये, आपल्या राज्यात फक्त औरंगजेब अन् धार्मिक तणाव,” राष्ट्रवादीची टिका
माझा भाषण झाल्यानंतर भारतीय जनता पक्षा मधल्याच एक कार्यकर्ते खासदारांनी असं भाषण केलं की धनगरांना आरक्षण द्यायचं आम्हाला माहिती नाही पण आमच्यातलं आम्ही एक टक्काही दुसऱ्याला देणार नाही. आमचा धनगर आरक्षणाला विरोध आहे. असं भारतीय जनता पक्षाच्या खासदारांनी ऑन रेकॉर्ड पार्लमेंट मध्ये म्हटलं. म्हणजे महाराष्ट्रात म्हणतात धनगरांना आरक्षण देणार, पण दिल्लीमध्ये त्यांची लाईन वेगळी आहे, मला असं वाटतं अनेकांना या गोष्टी माहिती असल्या पाहिजेत आणि पक्षाच्या कार्यकर्त्यांना आरक्षणाबद्दल मग धनगर मराठा लिंगायत मुस्लीम या सगळ्या आरक्षणाबद्दल माझी जयंतराव तुम्हाला दादांना विनंती राहील की या सगळ्याबद्दल आपली पॉलिसी सरकार काय करताय त्या सगळ्याची माहिती आपल्या सगळ्या कार्यकर्त्यांना दिली पाहिजे. असंही त्या म्हणाल्या.
READ ALSO :
हेही वाचा…“पुढचा मुख्यमंत्री हा राष्ट्रवादीचाच असला पाहिजे”, खासदार अमोल कोल्हेंचं विधान
हेही वाचा…“संयम बाळगा, कायद्याच्या चौकटीत रहा,” देवेंद्र फडणवीसांचा गीता जैन यांना सल्ला
हेही वाचा…“आधी धमकवले, मग काॅलर पकडली, अन् थोबाडात मारली..!” महिला आमदाराचा व्हिडीओ व्हायरल
हेही वाचा…“राहुल गांधी पंतप्रधान झाले तर सर्वांना तुरूंगात टाकायला सोपं होईल”, नाना पटोले
हेही वाचा…साताऱ्यात दोन राजे भिडले, एकाने नारळ फोडले तर दुसऱ्याने ऑफिस, कार्यकर्त्यांमध्ये मोठा राडा