मुंबई : आमदार गीता जैन यांनी पालिकेच्या कनिष्ठ अभियंत्याला भर रस्त्यात मारहाण केल्याची घटना घडली आहे. या मारहाणीचा व्हिडीओ सोशल मीडियावर देखील प्रचंड व्हायरल होत आहे. यावरून आता गीता जैन यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची मागणी होत आहे. काशिमीरा येथील अनधिकृत बांधकामावर कारवाई करण्याची मोहिम पालिकेने हाती घेतली आहे. यादरम्यान एका झोपडपट्टी बांधकामावर मंगळवारी कारवाई करण्यात आली. त्यावरून गीता जैन आक्रमक झाल्या अन् कनिष्ठ अभियंत्याला मारहाण केली. त्यावर राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी देखील प्रतिक्रिया दिली आहे. तर जीता जैन यांनी देखील यावर स्पष्ट भूमिका मांडली आहे.
हेही वाचा…कोविड काळात महाघोटाळा,? आदित्य ठाकरेंच्या निकवर्तीयांवर इडीचा छापा
गीता जैन यांनी मारहाण केल्यानंतर राज्यातील विरोधी पक्षातील नेत्यांनी त्यांच्यावर सडकडून टिका केली आहे. तर राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्यांना समज दिली आहे. ते लोकप्रतिनिधींनी संयम बाळगला पाहिजे हे ठीक आहे, की कधीतरी संताप होऊ शकतो. एखाद्या गोष्टीत राग अनावर होऊ शकतो. तरीही लोकप्रतिनिधींना संयम बाळगून कायद्याच्या चौकटीत काम करणं हेच योग्य आहे. असं देवेंद्र फडणवीसांनी म्हटलं आहे.
हेही वाचा…आमदारांना थांबवण्यासाठी उद्धव ठाकरेंकडे गेलो पण… गुलाबराव पाटलांनी सांगितला ‘तो’ किस्सा
दरम्यान, त्या बिल्डरने त्या माणसाचं झालेलं नुकसान भरून देण्यासाठी राजी झाला. तसेच यावर आता काहीही कारवाई करू नका, असं सांगून देखील त्यांनी त्या माणसांचं घर तोडलं. त्याठिकाणी असलेल्या महिला रडत होत्या. लहान लहान मुलं रडत होती. आणि शुभम पाटील त्याठिकाणी हसत होता. त्यामुळे त्याच्या थोबाडीत मारली असं गिता जैन यांनी सांगितलं आहे. तसेच पावसाळ्यात असा जीआर काढत नसतात. तरी देखील त्यांना तो जीआर काढला आहे. यावर वॉर्ड ऑफिसरशी देखील बोलणं झालं होतं. परंतु तरी देखील त्यांनी ही कारवाई केली. असंही गिता जैन यांनी म्हटलं.
READ ALSO :
हेही वाचा…“आधी धमकवले, मग काॅलर पकडली, अन् थोबाडात मारली..!” महिला आमदाराचा व्हिडीओ व्हायरल
हेही वाचा…“राहुल गांधी पंतप्रधान झाले तर सर्वांना तुरूंगात टाकायला सोपं होईल”, नाना पटोले
हेही वाचा…साताऱ्यात दोन राजे भिडले, एकाने नारळ फोडले तर दुसऱ्याने ऑफिस, कार्यकर्त्यांमध्ये मोठा राडा
हेही वाचा…“..तर एकनाथ शिंदेंनी स्वत:च्या डोक्यात गोळी घालून आत्महत्या केली असती,” मंत्र्यांचा खळबळजनक दावा
हेही वाचा…“१२३० कोटींची गुंतवणुक असलेला प्रकल्प गुजरातमध्ये, आपल्या राज्यात फक्त औरंगजेब अन् धार्मिक तणाव,” राष्ट्रवादीची टिका