मुंबई : वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर यांनी खुलताबाद येथे औरंजेबाच्या कबरीला भेट दिल्याने राज्यात नवा वाद निर्माण झाला. त्यानंतर राज्यातील राजकीय नेत्यांनी यावर आपापली प्रतिक्रिया दिली आहे. तर भाजपकडून उद्धव ठाकरे यांना निशाण्यावर घेण्यात आले. यातच आता उद्धव ठाकरे आणि प्रकाश आंबेडकरांचा एक पोस्टर लावण्यात आल्याने राजकीय वर्तुळात एकच चर्चा रंगली आहे.
हेही वाचा…“केसीआर अन् वंचितबाबत सावध रहा,” अजित पवारांच्या कार्यकर्त्यांना सुचना
माहिममध्ये उद्धव ठाकरे आणि प्रकाश आंबेडकर तसेच औरंगजेब यांचे फोटो असलेले बॅनर लावण्यात आलं आहे. त्या पोस्टरवर औरंग्याच्या थडग्यावर प्रकाश घालतो मुजरे, मुघली उदात्तीकरणासाठी सोबतीला उद्धवचे हुजरे असा एकेरी भाषेतील आशय या बॅनरवर होता. तसेच शिवरायांची जनता असं खाली लिहिण्यात आलं आहे. तर #UddhavThackerayForAurangzeb अर्थात औरंगजेबासाठी उद्धव ठाकरे असा हॉशटॅग बॅनरवर खाली छापण्यात आला आहे.
हेही वाचा…“२५ वर्ष युतीत घालवली त्या शिवसेनेला संपवायला सुद्धा मागेपुढे न पाहणारा ‘भाजप’ पक्ष किती राक्षसी वृत्तीचा”
दरम्यान, मुंबईतील माहिम भागातील केसरी टुर्स ऑफिससमोर बुधवारी मध्यरात्रीच्या हे बॅनर लावल्याची माहिती आहे. कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न टाळण्यासाठी पोलिसांनी काढून टाकलं. नेमके कोणी हे पोस्टर लावले याचा शोध सुरू आहे. याप्रकरणी अज्ञातांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असल्याची माहिती समोर येत आहे.
READ ALSO :
हेही वाचा…“अरे, बाबा..! मोदीजी देश चालवातयत, फक्त साडेतीन जिल्हे नाही”, मेघना बोर्डीकरांचा रोहित पवारांना टोला
हेही वाचा…साताऱ्यातील दोन राजे भिडले, फडणवीसांची घेतली भेट, फडणवीस म्हणाले की, “असं गंभीर…”
हेही वाचा…“एक बहिण म्हणून मला आनंद, मी त्याच्यापाठीमागे,” अजित पवारांच्या त्या विधानावर सुळेंचा पाठिंबा
हेही वाचा…“निवडणुका आल्या की दंगली घडविण्याचे प्रकार सुरु केले जातात”, छगन भुजबळांचा हल्लाबोल
हेही वाचा…“अजित पवारांना प्रदेशाध्यक्ष पद दिलं तर राष्ट्रवादीचे ‘१००’ आमदार निवडून आणतील”